नमस्कार शेतकरी मित्रानो राज्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरूवात झाली आहे. आज 19 जून राज्यात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात रीमसिम पाऊस पडणार आहे. 20 जून नंतर पावसाचा खंड राहील .
आज 19 जून या जिल्ह्यात मुसळधार panjab dakh live
शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत आणि दुसरीकडे पावसाने पाणीच पाणी केले आहे. मुंबई आणि कोकण पट्टीत गेल्या 2 दिवस पासून पाऊस सुरु आहे.आणि माराठवड्यात आणि विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे आणि उद्या पासून 20 जून पासून पाऊस विश्रांती घेणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात 28 तारखे पर्यंत पावसाची विश्रांती राहील त्या नंतर पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 28 नंतर राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असणार आहे आणि हा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे विदर्भातील जिल्ह्यात 28,29,30 तारखेला जोरदार पाऊस पडणार आहे.
शेतकऱ्यांनो पेरणी करू नका पाऊस बंद होणार panjab dakh live
सर्व शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे की पेरणी करू नका कारण राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. 30 तारखे पर्यंत पाऊस येणार नाही मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाचा मोठा खंड राहणार आहे त्या मुळे शेतकऱ्यांनी पेरणी करणे थांबवावे 1 जुलै नंतर पुन्हा सम्पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होणार आहे त्या वेळेस राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी जर तुमच्या शेतात व्याल असेल तर पेरणी करू शकतात राज्यातील पाऊस 8 दिवस खंड असणार आहे.