08
Mar
भारत-पाक यांच्यामध्ये 1971 ला युद्ध झाले आणि त्यावर बॉलीवुड ने 1997 साली बॉर्डर नावच सिनेमा तयार केला. या सिनेमात सुनील शेट्टी यांनी भैरोसिंग यांची भूमिका साकारली होती आणि त्या मध्ये सुनील शेट्टी शहीद झालेले दाखवले होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉर्डर चित्रपटाचा हा खरा हिरो भैरो सिंग आपल्याच भूमीवर जीवन जगत आहे. ते अजूनही आहेत. वीर शुरांची भूमी असलेल्या शेरगडच्या सोलंकियातल्या गावात जन्मलेले भैरोसिंग राठोड 1971 मध्ये जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर बीएसएफच्या 14 बटालियनमध्ये तैनात होते. जिथे भैरोसिंग यांनी आपले असामान्य शौर्य आणि पराक्रम दाखवताना पाक सैनिकांची दातखिळे बसवली होती. भारत-पाक सीमेवर लोंगेवाला पोस्टवर त्यांनी मेजर कुलदीप सिंग…