भारत-पाक यांच्यामध्ये 1971 ला युद्ध झाले आणि त्यावर बॉलीवुड ने 1997 साली बॉर्डर नावच सिनेमा तयार केला. या सिनेमात सुनील शेट्टी यांनी भैरोसिंग यांची भूमिका साकारली होती आणि त्या मध्ये सुनील शेट्टी शहीद झालेले दाखवले होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉर्डर चित्रपटाचा हा खरा हिरो भैरो सिंग आपल्याच भूमीवर जीवन जगत आहे. ते अजूनही आहेत.
वीर शुरांची भूमी असलेल्या शेरगडच्या सोलंकियातल्या गावात जन्मलेले भैरोसिंग राठोड 1971 मध्ये जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर बीएसएफच्या 14 बटालियनमध्ये तैनात होते. जिथे भैरोसिंग यांनी आपले असामान्य शौर्य आणि पराक्रम दाखवताना पाक सैनिकांची दातखिळे बसवली होती.
भारत-पाक सीमेवर
लोंगेवाला पोस्टवर त्यांनी मेजर कुलदीप सिंग यांच्या 120 सैनिकांच्या कंपनी बरोबर पाकच्या टाक्या नष्ट करताना शत्रू सैनिकांना ठार केले. एकेकाळी 5 रुपयांसाठी मजुरी करावी लागली,आज आहेत करोडो रुपयांचे मालक, जाणून घ्या द ग्रेट खलीबाबत…
शूरवीर भैरोंसिंग यांचे शौर्य
आणि त्याच्या शौर्यामुळे 1997 मध्ये बॉलीवुड ने बनवलेल्या बॉर्डर या चित्रपटात सुनील शेट्टीने राठोड याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात भैरोसिंगचे वर्णन शहीद म्हणून करण्यात आले होते, पण खऱ्या आयुष्यात मात्र या चित्रपटाचा खरा हिरो भैरोसिंग अजूनही जीवंत आहेत. आणि पूर्ण निरोगी जीवन जगत आहेत.
भैरो सिंग यांनी सांगितले
बॉर्डर चित्रपटात आपली भूमिका दाखवणे ही अभिमानाची गोष्ट आहे.तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासारखे आहे.पण शहीद म्हणून चित्रीकरण करणे चुकीचे होते, असे ते म्हणाले. त्यांना लष्करी मानधनाच्या स्वरुपात मिळणारे लाभ व निवृत्ती वेतन भत्ता मिळत नसल्याने ते निनावी जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे राठोड हे 1963 मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते आणि 1987 मध्ये निवृत्त झाले होते. मात्र आज वयाच्या 75 व्या वर्षीही ते जवानासारखे रोजचे जीवन जगत आहेत.
भैरोसिंग यांनी सांगितली लोंगेवालाची ही गोष्ट
आज लढाई जिंकून 48 वर्षे उलटून गेली.ऐतिहासिक विजय झाला पण आजच्या पिढीला हेच कळत नाही की लोंगेवाला कुठे आहे? गुलाम भारताच्या वीरांची कहाणी मुलांना जशी कळावी तशीच प्रत्येकाला स्वतंत्र भारताच्या सैनिकांची कहाणी कळावी अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात युद्धाच्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात. हे जगातील पहिले असे युद्ध होते जे केवळ 13 दिवस लढले गेले.16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने आपल्या सैनिकांसह भारतासमोर शरणागती पत्करली.हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.