साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडपेक्षा कमी लोकप्रिय आहे पण गेल्या काही वर्षांत टॉलीवूड चित्रपटांची प्रचंड क्रेझ आली आहे. त्यामुळेच आता साऊथचे सिनेस्टार्सही भरघोस मानधन घेत आहेत. या सगळ्यात आज या लेखात आपण टॉलिवूडच्या अशा 8 अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वाधिक मानधन घेतात.
1) अनुष्का शेट्टी
बाहुबली चित्रपटात देवसेनाची स्मरणीय भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा या यादीत अव्वल स्थानावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही दिग्गज अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे 4 ते 5 कोटी इतकी मोठी फी आकारते.
2) काजल अग्रवाल
View this post on Instagram
दाक्षिणात्य चित्रपट पाठोपाठ बॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री काजल अग्रवालही एका चित्रपटासाठी सुमारे 3 कोटी इतकी तगडे मानधन घेते.
3) पूजा हेगड़े
आला वैकुंठपुरमलोच्या यशानंतर अभिनेत्री पूजा हेगडेच्या फीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्रीला एका चित्रपटासाठी सुमारे 3.5 कोटी मानधन दिले जाते.
4) रश्मिका मंदाना
पुष्पा हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर रश्मिका मंदान्नाने आपला दबदबा निर्माण केला असून तिने तिची मानधन ही वाढवल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाला पुष्पा 2 साठी 3 कोटींची तगडी फी मिळणार आहे. सलमान खानने वयाच्या ५५ व्या वर्षी गुपचूप केले लग्न? सोनाक्षी सिन्हाचा सिंदूर भरलेल्या फोटो झाला व्हायरल
5) सामंथा रुथ प्रभु
समंथा रुथ प्रभू नुकतीच पुष्पा चित्रपटात आयटम साँग करताना दिसली. या गाण्यासाठी तिने दीड कोटींची तगडी फी घेतली होती. याशिवाय ती एका चित्रपटासाठी २ कोटी घेते
6) श्रुति हसन
साऊथचे दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनही या यादीत सामील आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे अडीच कोटी इतकी भरमसाठ फी घेते.
7) नयनतारा
नयनतारा हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी इतकी तगडी फी घेते.
8) कीर्थि सुरेश
अभिनेत्री कीर्ती सुरेश हे टॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी रुपये घेते.