रश्मिका मंदान्नाने विकी कौशलसोबत अंडरवेअर जाहिरात शूट केली आहे. तिची ही कृती पाहून तिच्या चाहते भलतेच नाराज झाले आहेत. अत्यंत कमी वयात साऊथ इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी नॅशनल क्रश हा मान मिळवला आहे. त्यामध्येच, ती आता तिच्या लेटेस्ट अॅड शूटमुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाने अलीकडेच ‘उरी’ अभिनेता विकी कौशलसोबत अंडरवेअर ब्रँडसाठी जाहिरात शूट केली. ज्याचा व्हिडीओ पाहून भडकलेल्या चाहत्यांनी अभिनेत्रीला चांगलेच सुनावले आहे.
जाहिरातीत रश्मिका मंदान्ना विक्की कौशलच्या अंडरवेअर फिदा होत असतांना दिसत आहे. ज्यामध्ये तीच्या प्रतिक्रिया आणि अॅक्शन दोन्ही चाहत्यांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे रश्मिकाच्या या व्हिडिओवर लोक जोरदार टीका करत आहेत, तसेच नॅशनल क्रशकडून अशी अपेक्षा नव्हती, असे ही चाहते म्हणत आहेत.
रश्मिका आणि विकीच्या जाहिरातीच्या व्हिडिओबद्दल सांगायचे तर, त्यात योग करण्याचे एक दृश्य दाखवले आहे, ज्यामध्ये रश्मिका एक शिक्षिका आहे आणि ती विकीची अंतर्वस्त्रे पाहून खूप उत्साहित होते. तेव्हापासून ती अंडरवेअर पाहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा राग सातव्या गगनाला भिडला असून, ट्रोल करणाऱ्यांनी रश्मिकाची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली आहे. Samantha Ruth Prabhu पुन्हा प्रेमात पडली, लेटेस्ट फोटो शेअर करत म्हणाली, ‘मी पूर्णपणे…
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘प्रिय रश्मिका मंदान्ना, मी तुमची जाहिरात पाहिली, माझ्यासाठी खूप निराशाजनक होती. तुझ्याकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती. तुम्ही हे करू शकत नाही कारण तुम्ही राष्ट्रीय क्रश आहात, लाखो हृदयांचे ठोके वाढवणाऱ्य आहात. मी काही चुकीचे बोललो असल्यास मला माफ करा. नेहमी हसत राहा.
दुसरीकडे, विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या ‘सरदार उधम’, ‘सॅम बहादूर’, ‘मिस्टर लेले’ अशा अनेक प्रोजेक्टमध्ये दिसला आहे. तर तिथेच रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’, ‘मिशन मजनू’ आणि ‘गुडबाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. विडियो पहा…