80च्या दशकात प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करणारी ही अभिनेत्री आठवते का? मंदाकिनीचा बदलेला लुक बघून थक्क व्हाल

80च्या दशकात प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करणारी ही अभिनेत्री

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनी तिच्या सुंदर डोळे आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आजही लोक तिच्या सौंदर्याचा मरतात. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी राज कपूरने तिला ब्रेक दिला. 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनीला वेगळी ओळख मिळाली. लाखो लोकांची मने जिंकल्यानंतर ती बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची अनेकांची इच्छा आहे.

सध्या फिल्मी दुनियेपासून दूर असलेली मंदाकिनी सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद सादत असते. ती दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वयाच्या ५८ व्या वर्षी तिने तिच्यात अनेक बदल केले आहेत, पण तिच्या चेहऱ्याची ती चमक आणि सौंदर्य आजही कायम आहे.

 

काही महिन्यांपूर्वी तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तिने निळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी कुर्ता घातला होता, ज्यामध्ये ती एकदम रॉयल दिसत होती. तिच्या या फोटोवर लोकांनी जोरदार कमेंट्स केल्या होत्या.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तिचे लग्न माजी बौद्ध भिक्खू डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी झाले आहे. त्याच्यासोबत त्यांना तीन मुले आहेत. त्याची मुलगीही तिच्या आईसारखी सुंदर आहे. ती आता तिच्या पतीसोबत तिबेटी योगशाळा आणि तिबेटियन मेडिसिन सेंटर चालवते.जय भीममध्ये सर्वाना रडवणारी ही अभिनेत्री वास्तविक जीवनात दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

मंदाकिनीने 2002 मध्ये बंगाली चित्रपटातही काम केले होते. याशिवाय ती २०१६ साली ‘कपूर अँड सन्स’मध्ये दिसली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तेजाब, लोहा, आखरी बाजी असे अनेक चित्रपट केले. पण 1996 मध्ये त्यांनी चित्रपट जगताला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून त्यांना फिल्मी दुनियेत ओळख मिळाली. या चित्रपटासाठी राज कपूरने याआधी डिंपल कपाडियाला साईन केल्याचे बोलले जात होते. पण मंदाकिनीला पाहिल्यानंतर त्यांनी डिंपलऐवजी मंदाकिनीला आपल्या चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.