रविवारी गाईला खाऊ घाला ही 1 वस्तु तुमचं घराचं स्वप्न लवकर पूर्ण होईल…

प्रत्येकाला वाटतं आपल्या स्वतःचे हक्काचे ,स्वप्नांचे घर असावे. कधी कधी खुप कष्ट ,मेहनत करूनही घर बांधताना , घर विकत घेताना खुप अडथळे, अडचणी येत असतात. आज जो उपाय सांगणार आहोत तो उपाय करून बघा तुमचं स्वतःच्या घराचे स्वप्न,इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी हा विशेष असणारा ज्योतिष उपाय करून बघा.

हा उपाय म्हणजे गोमातेला रविवारी ही वस्तु खाऊ घातल्यास आपले स्वतःचे घरं बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार. स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार. गोमातेचा आशीर्वाद तुम्हांला तुमचे स्वतःचे घर बांधण्यास किंवा विकत घेण्यास कोणीही रोखू शकणार नाही. खुप मेहनत ,कष्ट करूनही कधी-कधी कुणाच्या नशिबात भूमी सुख नसतं. दुसऱ्या कुणाच्या घरात आसरा घ्यावा लागतो. भाड्याने राहावे लागते. त्याचे स्वतःचे घर घेण्याचे , घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ह्या समस्या येत असतात त्याला कारण असतं काही अशुभ ग्रह.

आपल्या कुंडलीत जर मंगल निचस्थानी असेल आणि सूर्य कमजोर स्थानी असेल तर अडचणी येतात. कधी-कधी मंगळ आणि सूर्य ग्रहावर राहू-केतू-शनी यांसारख्या अशुभ ग्रहाचा प्रभाव असतो. या कारणांमुळे आपले स्वतःचे घर आपल्याला मिळत नाही. आपण भरपूर पैसा कमवूनही ,पैसा जवळ असताना सुद्धा आपल्याला स्वतःचे घर बांधता किंवा विकत घेता येत नाही.

आपण आपल्या घरातील कुटूंबाशी चर्चा करतो की असे घर बांधू, अशी सजावट करु, डेकोरेट करू अशी तयारी करतो पण घर विकत घेताना,बांधताना अनेक अडचणी येत असतात. ह्यासाठी कारण हेच असत की आपल्या नशिबात भूमी सुख नसतं.आपलं स्वतःच हक्काचे घर असावे किंवा बांधून पूर्ण व्हावे यासाठी तुम्हांला एक चांगला उपाय सांगत आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न नक्की पूर्ण होईल. हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य आणि मंगल मजबुत होईल, घर बांधताना,घेताना अडचणी येणार नाहीत.

उपाय खालीलप्रमाणे…

रविवारी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सूर्याला अर्ध्य द्यायचे आहे. लक्षात ठेवा सूर्याला अर्ध्य हे सकाळी सुर्यदयापासून ते 9 च्या आतच ह्या अचूक वेळी दयावे 9 च्या नंतर अर्ध्य देता येणार नाही.

सूर्याला अर्ध्य देण्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यावा, ताब्यांत गंगाजल किंवा कुठल्याही नदीचे पाणी किंवा घरातील ताजे पाणी घावे. ताब्यांत अक्षता म्हणजे न तुटलेले तांदुळ, लाल गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्या. पाकळ्या नसतील तर झेंडूचे फुल टाकावे.जर कुठलेही फुल उपलब्ध नसेल तर लाला कुंकु घेतले तरी चालेल आणि थोडा गुळ घेउन ताब्यांत टाकावे.

अर्ध्य देताना पूर्वेकडे तोंड करून आपले हात जितके उंच करता येतील तेवढे करावे अगदी डोक्याच्या वर हात करावे. सूर्याकडे नजर करून पाहत जल अर्पण करून अर्ध्य दयावे. अर्ध्य देताना ” ओम सूर्याय् नमः ” हा मंत्र जपावा. अर्ध्य देताना तांब्यातील पाणी पायावर पडू देऊ नका.अशा प्रकारे अर्ध्य द्यावे.

घरात पहिली बनवलेली पहिली भाकरी गुळ टाकून गोमातेला खाऊ घालावी. लाल रंगाची गाय असेल तर उत्तमच तो दुर्धशर्करा योगचं होईल.लाल रंगाची गाय नसेल तर कुठल्याही गाईला खाऊ घातलं तरी चालेल. गोमातेत 33 कोटी देवांचा वास असतो. हे लक्षात राहू द्या की गाईपुढे भाकरी फेकून द्यायची नाही आहे तिला तोंडात भरवायची आहे. असे 21 रविवार हा उपाय करायचा आहे.

गाईला भाकरी भरवताना मनात श्रद्धा असू दया की माझे स्वतःचे स्वप्नांतील घराचे स्वप्न पूर्ण होऊ दे. भाकरी भरवताना गोमतेच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवा. असे केल्याने तुमचे घराचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, आर्थिक अडचणी येणार नाहीत, घरासाठी काढलेले कर्ज सुद्धा लवकर फिटून जाईल. जो पर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे.

गोमातेला भाकरी खाऊ घातल्यामुळे समाजात तुम्हांला मान मिळेल, यश प्राप्ती होईल, दुर्भाग्य मागे लागले असेल तर भाग्यात बदल होईल, कोणतीही इच्छा पूर्ण होईल ,सुखात वाढ होईल ,वैवाहिक जीवन सुखकर होईल. हा उपाय करून तुमचं स्वतःच्या घराचे स्वप्न नकीच पूर्ण होवो अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. नक्की उपाय करा आणि आपले घराचे स्वप्न वास्तवात उतरवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *