बुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सप्टेंबर महिन्यात ५ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होत आहेत. नवग्रहांचा राजकुमार म्हणून मान्यता असलेला बुध आपले स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान होत आहे.

बुध ग्रह 24 सप्टेंबर रोजी तूळ राशीत विराजमान होत आहे. या तूळ राशीत आधीपासूनच शुक्र ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र एका राशीत असल्यावर लक्ष्मी नारायण योग जुळून येतो. हा योग अतिशय शुभ, अद्भूत असल्याची मान्यता आहे.

बुध ज्ञान, बुद्धी यांचा कारक मानला जातो. तर शुक्र भौतिक सुख, कला, साहित्याचा कारक मानला जातो. याशिवाय बुधवारी बुध ग्रहाचे होणारे राशीपरिवर्तन हे शुभ मानले जाते. बुधचे राशीपरिवर्तन आणि लक्ष्मी नारायण योगाचा सर्व राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव राहील. कोणत्या राशींना हा कालावधी लाभदायक ठरू शकेल, तर कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया…

मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत शुभवार्ता मिळू शकतील. कामाचा व्याप वाढला, तरी आपली कामगिरी उत्तम राहू शकेल. नवीन जबाबदारी मिळू शकेल. मात्र, कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे आणि संयम, धीराने गोष्टी हाताळाव्यात, असे सांगितले जात आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कामगिरीत सुधारणा होऊ शकेल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. गैरसमज दूर होतील. समाजातील मान, सन्मान वाढू शकेल. मात्र, खर्चात काही प्रमाणात वाढ संभवते, असे सांगितले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. धनवृद्धीचे योग संभवतात. या कालावधीत उत्साह आणि उर्जा यामध्ये वाढ होऊ शकेल. मात्र, अतिआत्मविश्वासावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूक करताना सारासार विचार करून करावी, असे सांगितले जात आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत संयम आणि सबुरीने गोष्टी हाताळणे लाभदायक ठरू शकेल. कोणत्याही वादात पडू नये. वाणीवर नियंत्रण ठेवावे. घरखरेदी किंवा जमिनीतील गुंवतणूक करण्यासाठी अनुकूल काळ असल्याचे सांगितले जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. व्यापार वृद्धीसाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग होऊ शकेल. तसेच त्यातून फायदाही मिळू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. मात्र, कोणतीही गंतवणूक करताना सारासार विचार तसेच तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मानसिक ताण कमी होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *