वाढत्या वयामुळे होणाऱ्या कंबरदुखी, गुडघेदुखीवर करा गूळ, हळदी आणि खायच्या चुन्याचा जालीम उपाय ; पैसे तर वाचतीलच पण दुखण्यापासून होईल झटपट मुक्तता.

वाढत्या वयात निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये पाठ दुखणे, अंग दुखणे, गुडघे दुखणे या समस्या अनेक जणांना जाणवतात. पाठीचे आणि गुडघ्याचे दुखणे हे कमालीचे वेदनादायी असते. गुडघ्याच्या दुखण्यामुळे चालताना देखील त्रास होतो आणि पाठीच्या दुखण्यामुळे उठणे आणि बसणे देखील मुश्किल होऊन जाते.

पाठदुखीचा आणि गुडघेदुखीच्या समस्येमध्ये वारंवार गोळ्या औषधे किंवा पेनकिलर घेणे अत्यंत चुकीचे आहे. पेनकिलर किंवा औषधी गोळ्या वारंवार घेतल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात एक असा घरगुती उपाय आहे ज्या उपायामुळे आपण या जीवघेण्या दुखण्यांपासून लवकरात लवकर बरे होऊ शकतो.

या उपायासाठी आपल्याला हळद, बारीक केलेला गूळ आणि खायचा चुना या तीन गोष्टी गरजेच्या आहेत.हा उपचार पूर्णतः आयुर्वेदिक आहे आणि यामुळे कोणतेही साईड एफेट्स आपल्या शरीरावर होत नाहीत.

सगळ्यात पहिले एक चमचा हळद घ्यावी आणि त्यात जुना गूळ घालावा. त्यानंतर यामध्ये खायचा चुना एक चमचाभर टाकायचा आहे आणि नंतर थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व एकत्र करून त्याचं घट्ट मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण हळुवारपणे आपल्या दुखणाऱ्या अवयवांवर म्हणजेच गुडघ्यावर किंवा पाठीवर लावावं.

हा उपाय केल्यास काही क्षणातच आपल्याला आराम मिळतो. औषधें किंवा गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ आराम मिळत नाही आणि पैसे देखील खूप लागतात. त्यापेक्षा हा सोपा घरगुती उपाय केल्यास आपल्याला लवकरात लवकर आरामही मिळेल आणि दुखण्यांपासून आपली मुक्तता होईल व पैसे देखील वाचतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.