चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ गरम करून; अन्यथा होईल अन्नातून वि’षबा’धा…

आपल्यातील अनेकांना जेवण हे गरम खायला आवडते. जर घरात जेवण आधीच बनवून ठेवलं असेल आणि नंतर थंड झालं असेल तर पुन्हा गरम करतो आणि खातो. तसेच आपल्या फ्रिजमध्ये एखादा पदार्थ शिल्लक राहिला असेल तर तो देखील आपण गरम करून खात असतो. अन्नपदार्थ गरम करून त्यांना टिकवून ठेवणे ही एक चांगली प्रक्रिया आहे.

मात्र अन्नपदार्थ वारंवार गरम करून खाणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. शरीराचं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे टिकून ठवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. कोणता पदार्थ कोणत्या पदार्थाबरोबर खावा हे आपल्याला बऱ्यापैक्की माहिती असणे गरजेचे आहे. तसेच कोणते पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खायचे नाही हे देखील माहित असणे गरजेचे आहे.

१. मशरूम : मशरूम म्हणजेच अळंबी हा पोषणाच्या बाबतीत एक चांगला स्रोत आहे. आपल्या आहारात अळंबी समाविष्ट असेल तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. मात्र मशरूमची कोणतीही रेसिपी करताना एका वेळेस पुरेल इतकीच करावी कारण आपण ती पुन्हा गरम केल्यास मशरूमध्ये असणारे काही घटक आपल्या पचनक्रियेसाठी नुकसानकारक ठरू शकतात.

२. भात : काही लोक रात्री उरलेला भात सकाळी गरम केल्यानंतर खातात, ते अजिबात करू नये कारण पुन्हा गरम भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. आपल्याला उलट्या, अतिसार आणि ओटीपोटात दुखण्याची समस्या देखील जाणवू शकते. कारण शिजवलेला भात बराच काळ सामान्य तापमानात म्हणजेच रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर स्पोअर्सच बॅक्टेरियामध्ये रूपांतर होतं. हे बॅक्टेरिया पोटात शरीरात गेल्यानंतर फूड पॉइझनिंगची शक्यता वाढते.

३. बटाटा : बटाट्या संबंधी कोणताही पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाणे टाळावा. कारण कारण असे केल्याने तुमची पचनसंस्था बिघडू शकते तसेच बोटुलिझमच्या दुर्मिळ जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देते.

४. पालक : पालक नेहमी ताजे खावे, पुन्हा गरम केल्याने तुम्हाला कर्करोगाचा धोका होऊ शकतो. त्यामध्ये उपस्थित नायट्रेट्स पुन्हा गरम केल्यावर काही घटकांमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

५. चिकन : चिकन हा असा खाद्यपदार्थ आहे जो पुन्हा गरम केल्यावर खाऊ शकत नाही कारण पुन्हा गरम केल्याने तुमचे पोट अस्वस्थ होते आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *