वांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय | वांगाचे डाग क्षणात गायब …

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग त्याचबरोबर पिंपल्स, डोळ्याखालील काळी वर्तुळे, या वरती साधा आणि घरगूती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा उपाय करून तुम्ही या ज्या सर्व प्रकारच्या व्याधी आहेत त्या मुळासकट नष्ट होतील. तसेच या उपायाने आपला चेहरा सुद्धा उजळून निघणार आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.


मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दही. अर्धा वाटी दही आपल्याला घ्यायचे आहे. मित्रांनो दही मध्ये जी प्रक्रिया झालेले असते तर या प्रक्रियेमुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या ज्या मृत पेशी आहेत ज्याला आपण डेड सेल म्हणत असतो तर या पूर्णपणे साफ करण्याचं काम हे दही मुळे होत असत. या नंतर दही मध्ये मिक्स करण्यासाठी दुसरा जो महत्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसनपीठ.

आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला चकाकी आणण्यासाठी, चेहरा उजळ करण्यासाठी बेसनपीठ हे अतिशय महत्वाच असत. फेकपॅक मध्ये सुद्धा बेसनपिठाचा खूप वापर केला जातो. तर एक चमचा बेसन पीठ आपल्याला दही मध्ये मिक्स करायचं आहे.

या नंतर या मध्ये आपल्याला या मिश्रणामध्ये अजून एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे तांदळाचे पीठ. मित्रांनो तांदळाच्या पिठाचा आपल्या त्वचेसाठी खूप फायदा होत असतो. आपल्या त्वचेवरील वांगाचे डाग हे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे पीठ अतिशय उपयुक्त आहे. तांदळाच्या पिठामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असे गणधर्म असतात. असे हे तांदळाचे पीठ एक चमचा घ्यायचे आहे.

या नंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला या मध्ये अजून एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे कापूर. आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग मुळासकट घालवण्यासाठी कापूर खूप फायदेशीर आहे. आपल्याला दोन ते तीन कापराच्या वड्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि या नंतर हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहे.

तयार होणारे जे मिश्रण आहे त्याचा जास्त परिणाम होण्यासाठी तुम्ही त्या मध्ये गुलाबपाणी घातले तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला सकाळी अंघोळी पूर्वी अर्धा तास चेहऱ्यावरती लावायचे आहे. त्याचबरोबर संध्याकाळी झोपण्यापूर्वी अर्धा तास हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे आहे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *