पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो हल्ली पोट साफ न होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे आणि या साठी आपण खूप सारी औषधे, किंव्हा अनेक प्रकारच्या चुरणांचा वापर करत असतो आणि या चुरणांचा वापर केल्यामुळे आपल्याला काही दिवसानंतर या सर्व औषधांची सवय लागते. नंतर अशी वेळ येते की ही औषधे घेतल्याशिवाय आपले सकाळी पोट साफ होत नाही.

परंतु आम्ही आज तुम्हाला दोन साधे आणि घरगुती उपाय सांगणार आहे. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला आठवड्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. नक्की तुमचा प्रॉब्लेम मुळासकट नष्ट होईल आणि तुमचं जे पोट आहे ते आतमधून स्वच्छ होण्यासाठी मदत होईल. तसेच आपल्याला जो पित्ताचा त्रास असतो, त्याचबरोबर आपल्याला जे करपट ढेकर येतात, अपचन होतो तर हे जे त्रास आहेत हे पूर्णतः हा उपाय केल्यानंतर नक्की फरक पडेल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागणार आहेत आणि याचा वापर कसा करायचा. चला पाहुयात.


मित्रांनो हा साठी आपण दोन उपाय पाहणार आहोत. एकदम साधे आणि सोपे उपाय आहे. मित्रांनो या दोनही पदार्था मध्ये एक वस्तू आपल्याला कॉमन लागणार आहे ती म्हणजे आले. तर या आल्याचा बारीक तुकडा चेचून घ्यायचा आहे. तुम्ही बारीक करण्यासाठी खलबत्त्याचा वापर केला तरी चालेल.

यानंतर या आल्या मध्ये आपल्याला मध टाकायचा आहे. हे दोन्ही चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला जेवणानंतर पाणी पिण्याच्या आधी हे मिश्रण खायचे आहे आणि त्या नंतर एक तासाभराने पाणी प्यायचे आहे. संध्याकाळी जेवणानंतर रोज जरी हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी पोट पासून पोट साफ होईल. तुमचं पोट आहे ते आतमधून स्वच्छ होईल.

यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो असा की एक तुकडा आले बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला एक खडा सेंद्रिय गूळ घालायचा आहे. हे दोन घटक चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहे. तर हे मिश्रण आपल्याला जेवणानंतर पाण्याऐवजी हे मिश्रण चावून खायचे आहे. त्यानंतर एक तासाने पाणी प्यायचे आहे.

हा उपाय तुम्ही नक्की करा. हे उपय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासूनच तुम्हाला फरक जाणवेल. असा हा उपयुक्त उपाय तुम्ही नक्की करून पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *