सुहागिन स्त्रिया या दिवशी केस धुतल्याने होते लक्ष्मी प्राप्ती वर्जित दिवशी हे उपाय करा केस धुवू शकाल…

सुहागीन महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवू नयेत हे आज आपण पाहणार आहोत. सुहागीन महिला ह्या गृहलक्ष्मी असतात. म्हणजेच आपल्या घरातील सुख-समृद्धी ही त्यांच्यावर अवलंबून असते. म्हणून ह्या स्त्रीयांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. ज्या दिवशी अमावस्या आहे पौर्णिमा आहे एकादशी आहे अश्या दिवशी चुकून ही केस धुवू नये, कारण या ज्या तिथी असतात या तिथी ला चंद्र उच्च किंवा निच्च थानी असतो, आणि या चंद्राचा थेट परिणाम आपल्या मस्तीशकावर होत असतो.

जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही ह्या दिवसांच्या आदल्या दिवशी केस धुवू शकता. तसाच ज्या दिवशी तुम्ही व्रत किंवा उपवास ठेवलेला आहे किंवा एकदा सण आहे उत्सव आहे त्या दिवशी ही तुम्ही केस धुवू नका. ह्या दिवसांच्या एक दिवस आधी केस धुण्यासाठी मान्यता आहे. जर वारांचा विचार केला तर रविवारी तुम्ही केस धुवू शकता. रविवारी केस धुण्यास कोणती ही अडचण नाही मात्र रविवारी तुमचा उपवास असेल, कोणतेही व्रत आपण ठेवलेले असले तर मात्र केस धुता येणार नाहीत.

सोमवारचा दिवस सुध्दा केस धुण्यासाठी शुभ मानला जातो. मात्र ह्या दिवशी आपण व्रत ठेवलेलं असेल उपवास असेल तर मात्र केस धुता येत नाहीत. जर अपर्याही कारणामुळे केस धुवायचेच असतील तर पलाश नावाच्या फुलांनी आपण आपले केस थोडेशे धुवा या पालाश्याच्या फुलाचा रस केसांना थोडासा लावा आणि मग आपण हे केस धुवू शकता.

मंगळवारच्या दिवशी कोणत्याही सुहागीन स्त्री ने आपले केस धुवू नये. कारण मंगळवारच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या घरी आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, पैश्याची हानी होते तसेच व्यावहारिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात आणि म्हणून या दिवशी केस धुवू नये. जर तुम्हाला धुवायचेच असतील तर आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडरीचा लेप आपण थोडा केसांना लावून मग केस धुवायचे आहेत.

बुधवार चा दिवस हा केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मात्र काही महिला ज्यांना धाकटा भाऊ आहे अश्या महिलांनी मात्र बुधवारच्या दिवशी केस धुवू नये. कारण या दिवशी केस धुतल्याने तुमच्या धाकट्या भावावर संकटे येऊ शकतात तर तुम्हाला या पासून बचाव करायचा असेल तर तुम्ही श्री गणेशांना किंवा वरुण देवांना आपला भाऊ मानू शकता.

ज्या वेळी आपल्या घरामध्ये एखादी पूजा चालू असेल त्या वेळी एक कलश्या मध्ये तांब्यामध्ये पाणी घेतले जात त्या वेळी ह्या कलश्याला प्रणाम करून वरुण देवाला विनंती करा हे वरुण देव आम्ही तुम्हला आमचा मोठा भाऊ मनात आहोत कृपया आमचं रक्षण करा. किंवा तुम्ही गणपतीला सुद्धा आपला मोठा भाऊ मानू शकता आणि यामुळे तुमचा ह्या गोष्टी पासून बचाव होईल जर तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा जो दोष लागतोय ह्या पासून वाचायच असेल तर तुळशीची तीन,चार पाने घेऊन त्याचा रस आपल्याला केसांना लावा मग त्या दिवशी तुम्ही डोक्यावरुन आंघोळ करू शकता.

गुरुवारच्या दिवशी स्त्री असेल किंवा पुरुष कोणीही आपल्या डोक्यावरून पाणी घेऊ नये किंवा आपले केस धुवू नये याच कारण अस आहे, गुरुवार च्या दिवशी अस डोक्यावरून पाणी घेतल्याने किंवा फरशी पुसल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते जर हा दोष दूर करायचा असेल ह्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचंच असेल तर हळद आणि बेसन एकत्र करून त्याचा जरासा लेप आपल्या केसांना लावा आणि मग तुम्ही तुमचे केस धुवू शकता.

शुक्रवारचा दिवस केस धुण्यासाठी अंत्यत शुभ आहे मात्र ज्या महिलांना पुत्र नाही आहे अश्या महिलांनी ज्यांना पुत्र प्राप्ती ची इच्छा आहे अश्या महिलांनी शुक्रवारच्या दिवशी कटाक्ष टाळायला हवे जर तुमचा ह्या दिवशी व्रत आहे उपवास आहे तर या दिवशी जरासे दही आपल्या केसांना लावावे आणि मग आपण आपले केस धुवू शकता.

शनिवारी चुकून ही आपण आपले केस धुवायचे नाहीत कारण शनिवार हा शनिदेवांचा वार मानला जातो आणि ह्या दिवशी केस धुतल्याने शनि देवांचा प्रचंड क्रोध आपल्या वरती निर्माण होतो आणि जर ह्या दोषा पासून वाचायचं असेल आणि तुम्हाला शनिवारचे केस धुवायचेच असतील तर तुम्ही कच्चे दूध घेऊन गायचे असेल तर उत्तमच तर ते दूध आपण आपल्या केसांना लावावं आणि मग आपण आपले केस धुवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *