स्वप्ना मध्ये साप दिसने कोणत्या गोष्टींचा संकेत आहे…

मित्रांनो ज्योतिषी शास्त्रा प्रमाणे स्वप्नात साप दिसणे हे शुभ किंवा अशुभ हे दोन्ही प्रकारचे संकेत असू शकतात. आज आपण स्वप्नात साप दिसल्यानंतर कोणत्या स्वरूपाचा संकेत मिळतो ते पाहणार आहोत. मित्रांनो स्वप्नात जर शिवलींगावरती जर साप दिसत असेल तर हा अतिशय शुभ संकेत समजावा. शिवलिंगाची कृपा आपल्यावर लवकरात लवकर होणार आहे.

स्वप्नामध्ये जर एखाद्या मंदिरामध्ये साप दिसला तर समजावं आपल्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. हे ह्या गोष्टीच संकेत आहेत. स्वप्नात जर पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर हे शुभ संकेत आहे आपल्याला यश कीर्ती मिळू शकते.

स्वप्नात काळा साप किंवा नाग दिसला तर समजा आर्थिक उन्नती आणि मान सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. मित्रांनो स्वप्नात जर आपल्याला एखाद्या सापाने चावा घेण्याचे दिसले तर येणाऱ्या काही दिवसात दुःखत घटना घडणार आहे. हे त्याचा संकेत आहे जर आपण सापाला मारून टाकण्याचे दिसले अथवा मेलेला साप दिसला तर समजून घ्या आपल्यावरील सर्व संकटे दूर होणार आहेत. आपले कष्ट समाप्त होतील आपल्यावरची राहुची पिडा बंद होईल.

जर आपल्याला स्वप्नामध्ये सापाचे दात दिसत असतील तर समजा आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला त्रास देऊ शकतात. किंवा आपल्याला नुकसान देऊ शकतात , त्यामुळे काही दिवस मित्रांपासून आणि नातेवाईकांन पासून सावध राहा . आणि विचारपूर्वक कामे करा.

जर स्वप्नामध्ये साप आणि मुंगूस यांची लढाई दिसली तर जरा संभाळून वागा कारण कोर्ट कचरीची चक्कर आपल्या जीवनात येणार याचा हा संकेत आहे. जर वारंवार स्वप्नामध्ये साप दिसत असेल नेहमी साप दिसत असेल तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आपण आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आहेत. आपली कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचे संकेत आहेत.

आपली शक्ती मूलाधार चक्रापासून कुंडलिनी चक्राकडे वाढतचाली आहे .यामूळे आपल्याला अनेक स्वरूपाचे अध्यात्मिक फायदे मिळू शकतात. आपली कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते याचा हा संकेत आहे.

स्वप्नामध्ये जर हिरव्या रंगाचा साप दिसला तर समजून घ्या की आपण जे काम करत आहात ते योग्य आहे, आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते. त्यामुळे आपल्याला आपले प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. मित्रांनो अश्याप्रकारे शास्त्राप्रमाणे साप दिसण्याचे हे संकेत सांगितले आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *