मृत्यू येण्याच्या काही दिवस आधी मनुष्याला मिळतात हे ७ संकेत..

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नि जाळू शकत नाही, पाणी कुजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही. म्हणजेच मनुष्याच्या देहातील आत्मा अमर आहे. त्याला कोणीही मारू शकत नाही परंतु मनुष्याचे शरीर अमर नाही. एक ना एक दिवस मनुष्याचा मृत्यू होणारच आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यूही निश्चित आहे.

जेव्हा मनुष्य या भौतिक जगात जन्म घेतो तेव्हाच त्याच्या मृत्यूची वेळ व कारण निश्चित होते. मृत्यू हा असा विषय आहे ज्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. मृत्यूपूर्वी होणारे आभास, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, पूर्वजन्म व पुनर्जन्म याबाबतचे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. परंतु आपल्या प्राचीन ग्रंथात मृत्यूशी संबंधित सगळी रहस्ये सांगितली आहेत.

गरुडपुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर आत्म्याच्या प्रवासाबाबत विस्तृत माहिती दिली आहे. गरुडपुराणात भगवान विष्णूनी गरूडाला मृत्यूनंतर होणाऱ्या गोष्टी, नरकलोक, नरकलोकातील यातना, स्वर्गलोक आणि त्यानंतर पुनर्जन्म या सगळ्या बाबतीत सांगितले आहे. पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक जीव जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेला आहे.

जस जन्म सत्य आहे तस मृत्यूही सत्य आहे. ज्याला कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे मृत्यूवर विजय मिळवणे अशक्य आहे. हे कटूसत्य माहीत असूनही प्रत्येकजण मृत्यूला घाबरतो. गरुडपुराणात असे काही संकेत सांगितले आहेत, जे जाणून घेतल्यावर आपण आधीच हे समजू शकतो की आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. चला तर मग जाणून घेऊया भगवान विष्णूनी गरुडाला मृत्यूपूर्वी मिळणारे असे कोणते संकेत सांगितले आहेत.

गरुडपुराणानुसार जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याची सावली त्याला सोडून जाते. अशा मनुष्याला तेल व पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. जर कोणबरोबर असे घडत असेल तर त्याला हे समजले पाहिजे की त्याचा अंतिम काळ जवळ आला आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला आजूबाजूला त्याचे पितर दिसू लागतात. तो समजून जातो की त्याचा मृत्यू जवळ आला आहे.

जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला स्वतःच्या शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो. तो त्याला अजिबात आवडत नाही. हा वास आल्यावर मनुष्याला समजून गेले पाहिजे की त्याचा अंतिम काळ जवळ आला आहे. जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू जवळ येतो आणि तो आरशात स्वतःचा चेहरा पाहतो तेव्हा त्याला स्वतःच्या चेहरयाऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतो किंवा कित्येक वेळेला स्वतःचा विद्रूप चेहरा दिसतो. हा आरसा त्याला मृत्यूची पूर्वसूचना देतो.

असे दिसल्यास त्या मनुष्याने हे समजले पाहिजे की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. मृत्यू जवळ आल्यावर माणसाचे शरीर पिवळे किंवा फिकट लाल दिसू लागते. त्याच्या त्वचेची आतून आग होते. पापी माणसांना नरकात जाण्याचे संकेत आधीच मिळतात. मृत्यू जवळ आल्यावर माणसानं सूर्य, चंद्राचा प्रकाश दिसत नाही. चंद्र तुटलेला दिसतो.

मरण जवळ आल्यावर माणसाची जीभ वळू लागते, नाक व तोंड कडक होते. त्यातून पू निघतो. त्याच्या दुर्गंधीने त्रासून तो मृत्यू मागू लागतो. मरण जवळ आल्यावर माणसाचे डोळे कमजोर होतात. त्याला बाजूला बसलेली माणसेही दिसत नाहीत. ज्या माणसाने आयुष्यात पुण्य कमवले असेल त्याला मृत्यू जवळ आल्यावर एक दिव्य प्रकाश दिसतो. असा माणूस मृत्यूला घाबरत नाही. परंतु पापी माणसाला मृत्यू जवळ आल्यावर डोळ्यासमोर भयंकर यमदूत दिसतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *