संपूर्ण श्रावण महिन्यात देवघरात ठेवा हि वस्तू पैशांचा पाऊस पडेल

मित्रांनो श्रावण महिना म्हणजे अत्यंत पवित्र असा महिना. या महिन्यात भोलेनाथांची, भगवान शंकरांची, महादेवांची मनोभावे उपासना केली जाते, व्रत उपवास केले जातात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पुजा केली जाते. यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

मित्रांनो अशा पवित्र महिन्यात आपण जे काही उपाय करतो, जे काही प्रयोग करतो त्याचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळते. त्यामुळेच अशा श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्ले, उपवास आणि अनेक ग्रंथांची पारायणे केली जातात. मित्रांनो अशा पवित्र श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या घरातील जो देवघर आहे त्या देवघरामध्ये संपूर्ण महिनाभर एक वस्तू ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो ही वस्तू देवघरामध्ये ठेवल्यानंतर या वस्तूची संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला पूजा करायची आहे. ज्या प्रमाणे आपण देवीदेवतांची पुजा करतो त्याप्रमाणे या वस्तूचीही आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूची पुजा करायची आहे. मित्रांनो ही वस्तू नेमकी कोणती आहे? ते आपण पाहुया. मित्रांनो ही वस्तु आहे सुपारी.

मित्रांनो कोणत्याही पूजा साहित्याच्या जी पूजेची सुपारी मिळते ती सुपारी आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या घरातील देवघरात पुजेसाठी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, आपल्या घरातील एखादी जुनी सुपारी असेल जी आपण आधी पूजेसाठी वापरली असेल तर अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही.

तर नवीन करकरीत, नवी सुपारी आपल्याला दुकानातून घेऊन यायची आहे आणि ती सुपारी संपूर्ण महिनाभर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या देवघरात ठेवून तिची आपल्याला पुजा करायची आहे.

दररोज अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या मंदिरातील, आपल्या देवघरातील देवांची पुजा करतो तेव्हा या सुपारीलाही स्नान घालून, हळद कुंकू लावून त्या सुपारीची पुजा करायची आहे आणि पुजा झाल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण या सुपारीची स्थापना केली आहे, ती मनोकामना आपल्याला मनातल्या मनात बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो संपूर्ण महिनाभर असेच केल्यानंतर जेव्हा श्रावण महिना संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला या सुपारीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. मित्रांनो या सुपारीचे विसर्जन केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व दुःख, पीडा नाहीशा होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या घरात धनधान्याची भरभराट होईल.

तुमच्या जीवनातील संकट, दुःख निघून जातील. तुम्ही सुद्धा घरात सुखसंपत्ती येण्यासाठी, समाधान नांदण्यासाठी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात धनधान्याची भरभराट होण्याची अशी एक सुपारी संपूर्ण श्रावण महिना तुमच्या देवघरात नक्की ठेवा. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *