औदुंबराची हि एक वस्तू नेहमी जवळ ठेवा, नशीब साथ देऊ लागेल पैसा सुख समाधान सर्व काही मिळेल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत ज्या केवळ एका उपायाने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होऊन जाईल. आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल. या उपायामुळे जर का कोणा व्यक्तीला बाधा झाली असेल, कसलीतरी भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होईल. ही वस्तू धारण करणाऱ्याचे ग्रह दोष निवारण होईल.

कर्ज मुक्तीच्या अनुषणगाने ही वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल. त्याच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. संत प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला आहे. तसेच ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह, भांडणतंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. मित्रांनो हे सर्व चमत्कारिक फायदे ‘औदुंबर वृक्षाचे’ आहेत. मग अशी कोणती गोष्ट औदुंबर वृक्षामध्ये आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या अश्या गोष्टीबदल सांगत आहोत की जी वस्तू आपण धारण केल्याने आपली अडलेली सर्व कामे त्वरीत व्हायला लागतील. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या उपयाविषयी…

मित्रांनो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरामध्ये आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्याच क्षणी तो खांब फोडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला त्याच्या राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले.

परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटात असणाऱ्या कालिकुंड विष्यामुळे भगवान नरसिंह यांच्या नखामध्ये प्रचंड दाह व्हायला लागला. त्यावेळी माता लक्ष्मीनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहाना त्यांची नखे त्या फळांमध्ये खुपसायला लावली. औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान यांच्या नखातील विष थांबले व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा वास सदैव औदुंबर वृक्षामध्ये असेल.

याच प्रमाणे नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहांचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा, कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले तेव्हा ते संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून तप करायचे. तिथे तप करताना 64 योगि त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असत. जेव्हा नरसिंह सरस्वती यांनी अमरापू सोडण्याचा निश्चय केला तेव्हा त्या 64 योगिनींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तेथून जाऊ नये.

त्यावेळी नरसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदुंबर वृक्षामध्ये राहील. माझा वास या औदुंबर वृक्षामध्ये कायम राहील. आपण जेव्हा ही माझे नाव घ्याल, मला आठवाल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईल. तर मित्रांनो या औदुंबर वृक्षामध्ये भगवान नरसिंह व माता लक्ष्मी यांचा वास तर असतोच याचबरोबर भगवान नरसिंहांचा अवतार असणारे नरसिंह सरस्वती महाराज यांचा ही वास असतो.

तसेच मित्रांनो औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, ऐश्वर्य यांचा कारक असतो. ज्या व्यक्तीचा सूर्य ग्रह मजबुत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. तर मित्रांनो आपल्याला करायचे काय आहे तर आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावरील शुक्रवारी किंव्हा गुरुपुष्य योगावर करू शकता. आपण जेव्हा केव्हाही हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षाजवळ जाऊन प्रार्थना करायची आहे.

म्हणजे समजा आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या दिवशी आपण औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला थोडे पिवळे तांदूळ अर्पण करावेत. तर असे पिवळे तांदूळ, पिवळे फुल आणि पाणी अर्पण करावे व मनोभावे प्रार्थना करावी की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे. तरी आपण कृपा करून माझ्या सोबत यावे व मला आपला कृपा आशीर्वाद द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून औदुंबराचे मूळ घरी आणावे. त्या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून आणावा.

मूळ घेऊन आल्यावर या मुळाला गंगाजल किंव्हा स्वच्छ पाण्याने साफ करावी. यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये किंव्हा एखाद्या पाठावर पिवळे वस्त्र अंतरुन त्याच्या वर थोडी चण्याची डाळ ठेवावी व या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेऊन त्याची विधिवत पूजा करावी. पूजा करून झाल्यावर या मुळाला मनोभावे प्रार्थना करावी की जी काही आपली अडलेली कामे असतील, ग्रह दोष असतील, संतान प्राप्तीची ईच्या असेल, कर्ज मुक्ती पाहिजे असेल, धनप्राप्तीची कामना असेल, अशी प्रार्थना करायची आहे.

नंतर तुम्ही हे मूळ आपल्याला देवघरात ठेऊ इच्छिता तर एक चांदीच्या किंव्हा स्टील च्या डब्यामध्ये कुंकू घालून त्या कुंकवामध्ये हे मूळ घालून ठेवावे. दररोज नित्य नियमाने याची पूजा करावी. या उपायामुळे आपली ईच्या पूर्ण व्हायला लागतील, माता लक्ष्मीची कृपा बरसेल, घरात पैसे यायला लागतील. या उपयामुळे आपल्याला घरात जबरदस्त असे परिवर्तन येईल. आपल्या सर्व ईच्या पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *