लोक पुन्हा पुन्हा ट्रेनच्या शौचालयात जात होते, नंतर जेव्हा सत्य समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्काच बसला…

ट्रेनच्या एका बोगीमध्ये ७२ बर्थ असतात. त्यामध्ये ३०० ते ४०० लोक ठासून भरलेले असतात. पण असे असूनसुद्धा आपली भारतीय रेल्वे तोट्यात चालते आहे. असे का ते माहीत नाही. ट्रेनमध्ये होणार्‍या अपघातांबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल. कधी कोणी ट्रेनमधून पडतो, तर कधी पूर्ण ट्रेन लुटली जाते. सुरक्षेच्या बाबतीत भारतीय रेल्वेची काय स्थिति आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून असाल. याचप्रकारे ट्रेनबद्दल अशी एक गोष्ट समोर आली आहे जी खरच हैराण करणारी आहे.

मामला आहे जयपुर मधील सिरोही येथील. शुक्रवारचा दिवस होता व आबूरोड रेल्वे स्टेशनवर दिल्ली अहमदाबाद एक्सप्रेस उभी होती. या ट्रेनमध्ये एस १० या कोचमध्ये एक महिला प्रवास करीत होती. पण काही वेळानंतर तिने काहीतरी अजब बघितले.

तिने बघितले की काही लोक सतत एस १० कोचच्या बाथरूममध्ये जात होते व बाहेर येत होते. तसे तर ही सामान्य गोष्ट होती पण त्या महिलेला ते थोडे विचित्र वाटले. नंतर ३ लोक एकत्र त्या बाथरूम मध्ये जात होते व थोड्या वेळाने बाहेर येत होते. असे कितीतरी वेळा होत होते.

ती महिला ते सगळे बघत होती. पण जेव्हा तिला राहावले नाही, तेव्हा तिने रेल्वे पोलिसला याची माहिती दिली. थोड्या वेळातच रेल्वे पोलिस तिथे पोहोचली. तेव्हा त्या महिलेने सांगितले की खूप वेळापासून ती बघते आहे काही लोक सतत एकत्र जमा होऊन त्या बाथरूममध्ये जात आहेत व थोड्या वेळाने बाहेर येत आहेत.

शेवटी जेव्हा रेल्वे पोलिस त्या बाथरूम मध्ये पोहोचली तेव्हा त्यांना एकदम अजब असा वास आला. तो वास अतिशय उग्र होता की पोलिसचे लोक तिथे १ सेकंद सुद्धा थांबू शकत नव्हते.

पण त्यांना समजले होते की हा वास कसला आहे. खरे तर तो वास दा’रू’चा होता. रेल्वे पोलिकांनी ताबडतोब त्या बाथरूमची तपासणी सुरू केली व त्यांना शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत दारू भरलेली मिळाली. शौचालयाची टाकी इंग्लिश दारूच्या ६० बाटल्यांनी भरलेली होती. त्याचबरोबर दारूच्या बाटल्या शौचालयाच्या छपरावर लपविल्या होत्या.

जेव्हा त्या लोकांना पकडण्यात आले जे परत परत तिथे जात होते, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनाही माहीत नव्हते की इथे दारू ठेवली आहे. पण त्यांना जेव्हा दारू मिळाली तेव्हा त्यांनी इतर लोकांना सांगितले व मग परत परत लोक बाथरूममध्ये जाऊ लागले.

रेल्वे पोलिस स्टेशनचे अधिकारी दिलीप सिंह म्हणाले, की ते या बाबतीत तपास करीत आहेत व एवढी जास्त प्रमाणात दा’रू कोणी लपवून आणली आहे याचा तपास करतो. पण जे चोर होते त्यांनी ट्रेनला पण सोडले नाही. कोणाला समजणार नाही की ट्रेन मध्ये कोणी दा’रू’ची त’स्क’री करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *