लक्ष्मीचे उपवास विवाहित महिलांनी करावे घराची परिस्थिती सुधारते सुख समृद्धी नांदते…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो लक्ष्मीचे उपवास, लक्ष्मीचे व्रत विवाहित महिलांनी करावे हे व्रत, घराची परिस्थिती या व्रताने सुधारते. सुख समृद्धी घरात नांदते. मित्रांनो विवाहीत महिलांनी हे व्रत, लक्ष्मीमातेचे व्रत अवश्य करावे. अगदी सोपे, सरळ हे व्रत असतात आणि महिलांनी, खास करून विवाहित महिलांनी वळे व्रत केले तर त्यांच्या घराची परिस्थिती नक्कीच सुधारेल. घरात सुख समृद्धी नांदेल. लक्ष्मीचा वास होईल, पैसा टिकू लागेल. कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. नवऱ्याची प्रगती होईल.

मग बिजनेस असुद्या, नोकरी असुद्या दोन्ही ठिकाणी प्रगती होईल. मुलांचे शिक्षणात लक्ष लागेल आणि त्यांचीसुद्धा प्रगती होईल. आता हे व्रत कसे करावे, कधीपासून करावे? तर मित्रांनो हे व्रत कोणत्याही महिन्यापासून सुरू करू शकतात. खास करून दर महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. खास करून श्रावण महिना सुरू होणार आहे तर श्रावणाच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. शुक्रवारी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून लक्ष्मीमातेचे आपल्या देवघरात दर्शन घ्यावे. त्यांना प्रार्थना करावी की आजपासून तुमचे व्रत सुरू करत आहे. तर तुम्ही आमच्या घरात वास करा, आमच्यावर कृपा करा. अशी प्रार्थना करून तुम्ही व्रताला सुरुवात करावी आणि त्याच शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक वेळेस फक्त श्री सुक्त वाचायचे आहे.

हे लक्ष्मी मातेचे स्तवन मानले जाते. तुम्हाला दुसरी कोणतीही पोथी वाचायची नाही. ना महालक्ष्मीची ना वैभवलक्ष्मीची तुम्हाला फक्त दर शुक्रवारी ज्या दिवशी उपवास केलेला आहे खासकरून शुक्रवारी तर तुम्हाला श्री सुक्त एक वेळेस वाचायचे आहे. यासाठी कोणतीही पुजा चौरंगवर किंवा पाटावर मांडायची गरज नाही. तुमच्या घरात लक्ष्मीची मुर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो देवघरात असायला पाहिजे. एवढाच हा नियम आहे.

दर शुक्रवारी उपवास केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्याच मूर्तीसमोर, फोटोसमोर एक श्री सुक्त वाचायचे आहे. अगरबत्ती, दिवा लावून ते श्री सुक्त वाचू शकता. फक्त देवघरामध्ये खडीसाखर ठेवू शकता आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवावा भाजी, चपाती वरणभात काही गोड शिरा किंवा खीर करून देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्याच नैवेद्याने तुम्ही उपवास सोडावा. दिवसभर तुम्ही फराळ करू नये, तुम्ही फळं खाऊ शकता आणि मिठाचे खायचे नाही म्हणजे आपण साबुदाण्याची खिचडी किंवा काहीतरी खातो ते खायचे नाही. फक्त फळे खाऊ शकता, सरबत किंवा ज्युस पिऊ शकतात.

अशा रीतीने तुम्ही उपवास करायचा आहे. श्रद्धा ठेवून मनोभावाने तुम्ही शुक्रवारचे व्रत करावे. किती शुक्रवार हे व्रत करू शकतो? तर मित्रांनो अकरा शुक्रवार तुम्ही हे व्रत करावे. म्हणजे अकरा शुक्रवार व्रत करायचे आहे. मध्ये काही प्रॉब्लेम,सुताक आले, अडचणी आली काहीही असुद्या त्यावेळेस फक्त उपवास करावा आणि श्री सुक्त वाचायचे नाही, नैवेद्य दाखवायचा नाही. फक्त उपवास करावा. पण तो शुक्रवार मोजायचा नाही म्हणजे तुम्हाला असे शुक्रवार मोजायचे आहेत ज्या दिवशी श्री सुक्त लक्ष्मी मातेसमोर वाचाल ते शुक्रवार तुम्हाला मोजायचे आहेत.

असे अकरा शुक्रवार मोजायचे. अकराव्या शुक्रवारी विधिनुसार काहीतरी गोडधोड संध्याकाळी नैवेद्य करून तुम्ही मातेला दाखवावा पुरणपोळी, खीर वगैरे करून आणि साध्या पद्धतीने उद्यापन करायचे आहे. काही जमलं तर पाच मुलींना घरी बोलवून जेवण करू शकतो किंवा शक्य नसेल तर फक्त मंदिरात जाऊन दानधर्म करू शकता. फळं दान करू शकता किंवा काहीही दान करू शकता. तर सोप्या पद्धतीचे हे लक्ष्मीचे उपवास आहेत जे श्रावणाच्या शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारपासून सुरू करू शकता. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *