रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द कितीही मोठा श’त्रू असू द्या…

नमस्कार मित्रांनो आपल स्वागत आहे. “आभाळाची साथ आहे अंधाराची रात आ, हे मी कोणासमोरही झुकत नाही कारण माझ्या डोक्यांवरती स्वामींचा हात आहे”. मित्रांनो आपले आयुष्य जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही लोक आपले मित्र बनतात तर काही लोक आपले शत्रू बनतात. मित्रांनो कधी कधी आपण आयुष्य जगताना हे निर्माण झालेले शत्रू इतके बलवत्तर, इतके शक्तीशाली बनतात, त्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ लागतो. यालाच आपण शास्त्रामध्ये श’त्रूपिडा असे म्हणतो.

मित्रांनो जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा तुमची प्रगती होते व जी प्रगती होऊ लागते तेव्हा तुमची ही होणारी प्रगती आहे ती अनेक लोकांच्या डोळ्यात खुपते. त्यांना तुमची झालेली प्रगती आवडत नाही. ते त्याचा तिरस्कार करतात आणि हेच लोक तुमचे शत्रू बनत असतात. कधीतरी मित्रांनो तुमच्या जवळचे असणारे मित्र सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे तुमचे श’त्रू बनतात. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या घराच्या शेजाऱ्यांचा किंवा तुमच्या उद्योगधंद्यातील जे स्पर्धक आहेत त्या सर्वांपासून तुम्हाला त्रास होत असेल तर यालाच आपण श’त्रूपिडा असे म्हणतो.

मित्रांनो तुमचे हे जे शत्रू आज सांगितलेल्या उपायांनी न’ष्ट होतील. त्यांचं बळ कमी होईल व त्यांच्यापेक्षा तुमचं बळ जास्त होईल. मित्रांनो आज आपण श’त्रूपिडेवरचा उपाय पाहणार आहे. मित्रांनो यासाठी आपण रोज देवपूजा करत असतो. त्यामध्ये आपण दिवा तर नक्कीच लावत असाल. देवपूजा करताना तुम्हाला एक दिवा असा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. मित्रांनो या मंत्रातील शब्द हे इतके सामर्थ्यवान व इतके ताकदवर आहेत की तुमचे शत्रू या मंत्रापुढे, या उपायापुढे नक्कीच गुढघे टेकतील.

आपण जी रोज देवपूजा करतो त्यापुढे आपण दिवा नक्की लावत असाल. आपण देवासमोर दिवा लावण्याचे कारण दिव्यामुळे शुभ आणि मंगल गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. देवीदेवता, भगवंत, स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात. खरतर दिवा आपल्याला परमात्माशी, ईश्वराशी जोडत असतो आणि म्हणूनच कोणतेही मंगल कार्य असुद्या, मंगल कार्यामध्ये आपण हा दिवा नक्की लावत असतो.

मित्रांनो ज्या घरामध्ये सकाळी, संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरातील वातावरण पवित्र असते. सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. हा उपाय करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. पहिला नियम आहे , हा दिवा लावताना स्त्री असेल तर स्त्रीने डोक्यावर पदर नक्की घेतला पाहिजे. जर पुरुष हा दिवा लावत असेल तर त्या पुरुषाने आपल्या डोकावरती टोपी नक्की घातली पाहिजे. जर तुमच्याकडे टोपी नसेल तर तुम्ही डोक्यावर रुमाल घेऊ शकता.

दुसरी गोष्ट ती आहे म्हणजे आपण दिवा लावताना त्या दिव्याखाली एखादे झाडाचे पान, फुल किंवा तांदूळ धनधान्य ठेवायचे आहे आणि नंतर त्या धान्यावर, फुलावर, पानावर हा दिवा ठेवायचा आहे. दिवा तसाच जमिनीवर ठेवायचा नाही. त्यामधील कोणतीही एक वस्तू आपण दिव्याखाली नक्की ठेवायची आहे. दिव्याला आपण प्रत्यक्ष भगवंतासारखे मानतो. परमेश्वराला आपण दिव्यामध्ये पाहत असतो. त्यामुळे त्याखाली कोणतीही एक गोष्ट नक्की ठेवायला पाहिजे.

मित्रांनो आपण दिवा लावताना जे तेल वापरायचे आहे ते मोहरीचे तेल असावे. जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन लवंगा नक्की टाका. शास्त्रामध्ये लवंग दिव्यामध्ये टाकल्याने खुप चमत्कारिक फायदे होतात. त्यामुळे आपली श’त्रूपिडा नाहीशी होऊ शकते. लवंग टाकल्यानंतर आपण दिव्याची पुजा करायची आहे. देवीदेवतांची पुजा करायची आहे. स्वामींची, भगवंतांची हळदी कुंकू लावून, अक्षदा वाहून पुजा करायची आहे. हा उपाय श’त्रूपिडा न’ष्ट करण्यासाठी करत आहे.

श’त्रूपासून आपली मुक्ती होण्यासाठी करत आहोत आणि हा दिवा लावल्यानंतर त दिव्यासमोर, देवांसमोर, स्वामींसमोर हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे ” शुभम करोती कल्यानमः आरोग्यम धनसंपदा शत्रू बु’द्धी विनाशाय दिपज्योति नमस्तुते”.

हा मंत्र म्हटल्यानंतर आपण भगवंतांना, देवीदेवतांना, स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि ही एक गोष्ट सांगायची आहे की माझी या शत्रूंपासून मुक्तता होऊ दे, श’त्रूंच्या त्रासातून मुक्त कर, त्यांच्या जाचातून मला मुक्त कर व माझ्या घरावर सदैव तुमची कृपा दृष्टी राहू दे व आमच्या घरामध्ये सुखशांती व समृद्धी, समाधान, आरोग्य सर्वकाही नांदूदे. या गोष्टी नक्की करा. तुमच्या आयुष्यातील श’त्रुपिडा नक्की नष्ट होईल. ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ, त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.. आणि कंमेंट मध्ये ।।श्री स्वामी समर्थ।। लिहायला विसरू नका. धन्यवाद… अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *