अजूनही सुरू आहे करीना कपूर आणि प्रियंका चोप्राची दुश्मनी…म्हंटली असे काही कि…

बॉलीवूडमध्ये अनेकदा असे ऐकायला मिळते की एखाद्या अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीच्या रंगावर टिप्पणी केली, कोणी कोणाच्या अभिनयावर किंवा शरीरयष्टीवर टिप्पणी केली. अशा गोष्टी बॉलीवूडमध्ये वर्षानुवर्ष चालतात. अशा भांडणाची यादी खूप मोठी होईल. पण प्रसिद्ध भांडणं आहेत करीना कपूर खानची. करीना कपूर खानची अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बरोबर भांडणं झाली आहेत. यातीलच एक आहे प्रियंका चोप्रा बरोबर.

अनेक वर्षानी या दोस्ती करताना दिसल्या तरी याच्यातील भांडणं संपली असे वाटत नाही. कॉफी विथ करण या शोमध्ये या दोघी एकत्र आल्या व मस्तीही करत होत्या. तरीही एकमेकींना टोमणे मारण सोडत नव्हत्या. जेव्हा डिसेंबर २०१८ मध्ये प्रियंकाचे निक जॉनस बरोबर लग्न झाले तेव्हा करीना कपूर खान अनेक कमेन्ट करत होती, प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षपणे.

तेव्हा अनेक मुद्दे समोर आले होते. जसे बॉलीवूड मध्ये अभिनेता अभिनेत्रीपेक्षा मोठा असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा मोठी असेल आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असतील तर मात्र प्रॉब्लेम होतो.

जेव्हा सलमान खानचा भारत सिनेमा प्रकाशित झाला, तसेच दबंग ३ या सिनेमात सई मांजरेकर आपल्यापेक्षा निंम्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर काम करणार होते तेव्हा या बाबतीत जेव्हा करीनाला विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की बॉलीवूडमध्ये अनेकवर्ष ती हेच पहात आली आहे.

अभिनेत्याचे वय जास्त असेल आणि अभिनेत्रीचे कमी असेल तरीही तो तिच्याबरोबर रोमान्स करू शकतो. त्याला कोणी काही बोलत नाही. पण जर अभिनेत्रीचे वय अभिनेत्यापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्यात रोमान्स असेल तर मात्र सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. पण आता खऱ्या आयुष्यात या गोष्टी बदलू लागल्या आहेत असे ती म्हणाली.

प्रियंका आणि निकचच उदाहरण घ्या. या दोघांच्या वयात बराच फरक असूनही, प्रियंका निकपेक्षा वयाने मोठी असली तरी यांचे लग्न झाले ना असे करीना टोमणा मारत म्हणाली. ती पुढे म्हणाली की, मी आता वयाच्या अशा टप्प्यावर आहे की माझ्या समोर लहान वयाचा अभिनेता असू शकतो.

मला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल. मला हा अनुभव घ्यायला आवडेल. मग मी बघते की कोण आणि कस या मुद्द्यावर बोलतय की अभिनेत्री मोठी आणि अभिनेता लहान. म्हणजे पुन्हा एकदा तिने उपहासाने प्रियंकाला टोमणा मारला. तर करीना आणि प्रियंका मध्ये ही भांडण अनेक वर्षांपासून चालत आलेली आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटत ते आम्हाला नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *