देवघरात शिवलिंग असेल तर ही 1 चूक करू नका घर बरबाद होते…

देवाधिदेव महादेव चराचरात असलेली ऊर्जा आहेत. शिव निराकार आहेत. भगवान शकरांना समजणे सोपे नाही पण ते ज्याला समजले त्याला परमानंद मिळतो. जगात शंकराचे अनेक भक्त आहेत. भगवान शंकरही आपल्या भक्तानवर भरपूर कृपा करतात.

आपण बरेचवेळा आपल्या घरातही शंकराची मूर्ती, तसबीर किंवा शिवलिंग ठेवतो व त्याची पूजा करतो. शास्त्रात शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग घरात ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत. ज्यांचे आपण कठोर पालन केले पाहिजे. नाहीतर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

शिवलिंग दगडाची, मातीची, धातूची, काचेची, संगमरवराची, पारद शिवलिंग, स्फटिकाची असतात. यातील पितळेचे, पारद, स्फटिकाचे शिवलिंग उत्तम समजतात. नर्मदा नदीतून मिळणारी शिवलिंग घरी ठेवणे उत्तम समजले जाते. शिवलिंगाची ऊंची तीन इंच किंवा आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा जास्त असू नये. घरात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये. केवळ रोज त्याची पूजा करावी.

शंकराची प्राणप्रतिष्ठा केवळ मोठ्या देवळात केली जाते. घरातील शिवलिंगवर नाग व नंदी असू नये. घरात शंकराची पिंडच असावी, तसबीर किंवा मूर्ती ठेऊ नये. घरी रोज शंकराची पूजा करावी. ते शक्य नसेल तर दर सोमवारी, महाशिवरात्रीला, अन्य महत्वाच्या दिवशी पूजा करावी. देवघरात केवळ एकच शिवलिंग असावे. जास्त असल्यास त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

शंकराला नेहमी जलाअभिषेक करावा. त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवलिंग नेहमी उघड्या ठिकाणी ठेवावे. ते कधीही बंद, अंधाऱ्या ठिकाणी ठेऊ नये. शिवलिंगासोबत पार्वती, गणपती, कार्तिकेयाची तसबीर जरूर ठेवावी. तुळशीवृंदवानंत शिवलिंग ठेऊ नये. याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

शंख, नारळपानी, उकळलेले दूध, केतकीची फुले, तुळशीची पाने, कुंकू, हळद इत्यादि शंकराच्या पूजेत वर्जित असलेल्या वस्तु शिवलिंगावर वाहू नयेत. भगवान शंकर वैरागी व निरांकार आहेत. त्यांना प्रसन्न करणे कठीण नाही. ते ज्या भक्तावर प्रसन्न होतात त्याच्या जीवनातील सगळ्या चिंता दूर करतात.

भगवान शंकर लवकर क्रोधितही होतात. याचे वाईट परिणाम भोगायला लागू शकतात. त्यामुळे जर सगळे नियम पाळून, श्रद्धेने पूजा करू शकत असाल तरच घरात शिवलिंगाची स्थापना करा. नाहीतर एखाद्या देवळात जाऊनही तुम्ही पूजा करू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *