जेव्हा ४० वर्षांनंतर या मंदिराचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा बघणाऱ्यांचे होशच उडाले…

तुम्ही अशा मंदिराबद्दल ऐकलय का जिथे देवाची मूर्ती ४० वर्षांनी भक्तांना भेटायला येते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही मूर्ती ४० वर्ष पाण्याखाली असते. ही मूर्ती लाकडाची आहे आणि पाण्याखाली राहूनही हिला काहीही झालेले नाही. ही मूर्ती ४० वर्ष पाण्याखाली का बर असते? कोणत्या देवाची आहे ही मूर्ती?

भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथे एक अद्भुत मंदिर आहे. या देवळाचे नाव आहे भगवान वरदराजास्वामी मंदिर. इथे भगवान अतिवरदारची मूर्ती ४० वर्षातून एकदा भक्तांना दर्शन देण्यासाठी काही दिवसांसाठी पाण्यातून बाहेर येते. ही मूर्ती मागच्यावेळी बुधवार, ३ जुलै २०१९ रोजी जलसमाधीतून बाहेर आली होती आणि त्यानंतर ४० वर्षांसाठी जलसमाधीत गेली आहे.

या मंदिरावर भक्तांची भरपूर श्रद्धा आहे. भगवान अतिवरदारांची मूर्ती पवित्र तलावातून बाहेर काढल्यावर मंदिराच्या वसंतमंडपात भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाते व तिची पूजा केली जाते. ज्या अनंतसरोवरात भगवान अतिवरदारांची मूर्ती ठेवली जाते त्याचं पाणी कधीही कमी होत नाही आणि ४० वर्षात कधीही आटत नाही. मूर्ती बाहेर काढण्यासाठी सरोवराचे पाणी बाहेर काढले जाते,

तेव्हा ४८ दिवस हे सरोवर कोरडे असते. असे सांगतात की १९६९ मध्ये जेव्हा ही मूर्ती पाण्यात ठेवण्यात आली त्या रात्री इतका पाऊस पडला की ही सरोवर भरून गेले. भगवान अतिवरदारांची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे. ही नेहमी पाण्यातच असते. तरीही ती कुजत नाही. या मुर्तीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत किंवा यावर कोणतेही लेपन करण्यात आलेले नाही. ही मूर्ती जशी पाण्यातून बाहेर काढली जाते, ती पुन्हा तशीच पाण्यात ठेवली जाते.

मंदिर व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही मूर्ती बनवली तेव्हाच कदाचित यात एखादा धातू किंवा एखादी वस्तु मिसळण्यात आली असेल ज्यामुळे ही मूर्ती पाण्यातही कधीही खराब होत नाही. ही लाकडाची मूर्ती जेव्हा पाण्यात ठेवतात तेव्हा ती पाण्यावर येऊ नये म्हणून मूर्तीच्या छातीवर दगडाने बनवलेल्या अनेक किलो वजनाच्या शेषनागाच्या ७ मूर्ती ठेवतात.

सरोवरतून बाहेर काढल्यावर ४८ दिवस ही मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. त्यातील सुरवातीचे ३१ दिवस देवाला शयनमुद्रेत ठेवले जाते. शेवटचे १७ दिवस मूर्ती उभ्या स्थितीत ठेवली जाते. मूर्ती पाण्यातून बाहेर काढणे व परत पाण्यात ठेवण्याच्या कामात मंदिराचे मुख्य पुजारी व काही खास कर्मचारी सहभागी असतात. यावेळी पुजारी वेदमंत्र पठन करतात.

पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा अतिवरदारांनी पुजाऱ्यांना स्वप्नात येऊन सांगितले की देवाची मूर्ती अनंतसरोवरात ठेवावी व पूजेसाठी दगडाची मूर्ती बनवावी. या मूर्तीचे दर्शन कसे होणार असे विचारल्यावर ४० वर्षातून एकदा ४८ दिवसांसाठी मूर्ती बाहेर काढावी असे उत्तर मिळाले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की दक्षिणेत मुघलांचे आक्रमण झाले तेव्हा ही मूर्ती सरोवरात लपविली गेली. नंतर पुजाऱ्यांच्या मुलांनी ४० वर्षानी ती बाहेर काढली आणि तेव्हापासून ४० वर्षांची ही परंपरा सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *