वास्तुशास्त्रानुसार ह्या 2 मुर्ती एकत्र देवघरात या ठिकाणी असेल तर येईल राजयोग..

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. ज्या घरात दोन संयुक्त मूर्ती किंवा फोटो असतात तेथे येतो राजयोग. तर त्या दोन संयुक्त मुर्ती किंवा फोटो कोणते ते आपण पाहुया. आपण आपल्या घरात नेहमी देवांच्या मुर्तीची पुजा करत असतो. आता या संयुक्त मुर्तीची काय महत्त्व आहे ते आपण पाहुया. ज्या घरात या संयुक्त मुर्ती असतात त्या घरात राजयोग येतो.

आपण घरात रोज देवांची पुजा करत असतो व देवांची संयुक्त मुर्ती घरात असतील तर मनात जी इच्छा ठेवील ती इच्छा पूर्ण होते. आपण देवाऱ्यात देवतांचे फोटो ठेवत असतो, त्याची नियमित पुजा करत असतो व आशीर्वाद घेत असतो. आपल्या जीवनात काही अडीअडचणी असतील तर ते संपतील. तर त्या कोणत्या दोन मुर्ती संयुक्त ठेवल्या पाहिजे त्या ठेवल्याने सुखसंपन्न होते.

पहिली मुर्ती आहे कृष्णाची मुर्ती. आपण आपल्या घरात बालगोपाळांची मुर्ती म्हणजे कृष्णाची मुर्ती सर्वांच्याच घरात असते. आपण कृष्णाच्या मुर्तीची पुजा करत असतो. ह्या बालकृष्णाच्या मूर्तीबरोबर माता राणी राधाजींची मुर्ती असावी म्हणजे राधाकृष्णाची जोडीची मूर्ती किंवा फोटो घरी आणा. देवाऱ्यात किंवा हॉलमध्ये, अगदी बेडरूममध्ये ठेवला तरी चालतो. ज्या घरात राधाकृष्णाची मुर्ती किंवा फोटो असेल तर त्या घरात वादविवाद किंवा भांडणतंटा कमी प्रमाणात होतो.

पती पत्नी आणि घरातल्या कुटुंबात स्नेह, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते. तुम्ही जर घरात राधाकृष्णाची मूर्ती ठेवली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपण राधाकृष्णाची मुर्ती ठेवतो तशीच आपण लक्ष्मीमातेची मुर्ती किंवा फोटोची पुजा करत असतो. तर लक्ष्मी मातेबरोबर तुम्ही विष्णू लक्ष्मीची मुर्तीची किंवा फोटोची पुजा केली पाहिजे. विष्णू लक्ष्मीच्या जोडीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिउत्तम. असेही मानण्यात आहे की ज्या घरात विष्णुजी आहेत तिथून लक्ष्मी जावू शकत नाही.

कारण जिथे विष्णूजी आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहणार. त्यात काही शंकाच नाही. विष्णु लक्ष्मीचा फोटो हा उभा नसावा, बसल्या स्थितीत दोघांचा फोटो असावा. तसेच लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती असलेला फोटो घरात ठेवला तरी चालतो. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती ठेवली तर घरात धनलाभ होतो. आता दुसरी मुर्ती आहे हनुमानाची. हनुमानाची मुर्ती तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता व त्याची पुजा करू शकता.

हनुमानाची मुर्ती किंवा फोटो देवघरात ठेवल्याने प्रगती होते. कारण हनुमान हे महाबली, शक्तीशाली आहेत. तसेच हनुमानाचा फोटोबरोबर श्रीरामाचा फोटो किंवा मुर्तीची पुजा केली तर अतिउत्तम. हनुमान हे श्रीरामाचे भक्त आहेत म्हणून हनुमान व श्रीराम यांचा संयुक्त म्हणजे एकत्रित फोटो किंवा मुर्ती अवश्य घरात असावी. तसेच श्री रामदरबाराचा फोटो जरी मिळाला तरी देवघरात लावावा. तुम्ही हनुमानाची पुजा बरोबर श्रीरामाची पुजा केली तर तुम्हाला हनुमान, श्रीराम, सीता व अन्य देवतांचा आशीर्वाद मिळेल. तसेच तुम्हाला ब्रम्हा, विष्णु, महेश यांची संयुक्त किंवा एकत्रित फोटो मिळाला तर तो ही घरात आणून अवश्य पुजा करा.

ब्रम्हा विष्णू महेश यांच्या संयुक्त फोटोच्या पूजनेने मोठ्यात मोठे संकटे नाहिशे होतात. तर आता देवघरात मुर्ती कशा असाव्यात व किती असाव्यात हे पाहुया. गणपतीची मुर्ती एकच असावी. एकापेक्षा जास्त असू नये. तसेच शिवलिंगची मुर्तीही एक, तीन, पाच एवढ्या अंकात असाव्या. देवघरात दोन शिवलिंग पूजनात नसावे. तसेच शिवलिंग साईझ आकाराने अंगट्यापेक्षा लहान साईझ चे असावे. अंगट्यापेक्षा मोठे शिवलिंग असू नये.

घरात हनुमानाची मुर्ती पूजनात असेल तर हनुमानाची बसलेली मुर्ती असावी. बजरंगबली हे शिवलिंग अवतार आहेत. म्हणूनच हनुमानाची बसलेली मुर्ती असावी. हनुमान हे बालब्रम्हचारी आहेत. म्हणून त्यांची मुर्ती बेडरूममध्येही ठेवू नका. त्यांची मुर्ती देवाऱ्यातच असू द्या. तसेच राधाकृष्णाची मुर्ती बेडरूममध्ये ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर राधा कृष्णाच्या जोडीचा फोटो पाहिला तर तुमचा दिवस आनंदी व उत्साही जाईल.

तुम्ही जर दुर्गामातेची मुर्ती जर आणणार असेल तर मुर्ती क्रोधीत स्वरूपात, महाकाली मातेच्या रुपात कधीही आणू नका. तसेच घरातले पूर्वज वारलेले आहेत त्यांचे फोटो कधीही देवाऱ्यात ठेवू नका. असे फोटो देवाऱ्यात ठेवल्याने अशुभ घडू शकते. तसेच देवघरात शनिमहाराज, राहुकेतू यांची मूर्ती देवाऱ्यात काय घरातही ठेवू नका. कारण मंत्र तंत्र साधनेसाठी वापरतात. तर वर सांगितलेले संयुक्त घरी फोटो किंवा मुर्ती आणा आणि राजयोग मिळवा. धन्यवाद..।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *