भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चांगली वेळ येण्याआधी मिळतात हे ७ संकेत- वास्तुशास्त्र….

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल, तर माझ्या माहितीला लाइक व शेअर करायला विसरू नका. जीवन-मृत्यू, सुख-दू:ख, नुकसान-फायदा, खुशी-गम ही सगळी जीवनातील महत्वाची अंगे आहेत. कधी जीवनात आनंदाचा प्रकाश असतो, तर कधी दू:खाचे ढग पण पसरतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उतार-चढाव तर येताच असतात. हे सगळे वेळेच्या चक्रानुसार चालते. वेळेच्या पुढे कशाचेही महत्व नाही. वेळेसमोर सर्वांना झुकावेच लागते.

तुम्ही तुमच्या जीवनात कितीतरी प्रकारची माणसे उंच्च स्थानावरून जमिनीवर आलेली व राजाचा रंक झालेली नक्कीच पाहिले असेल. वेळ असे एक हत्यार आहे, ज्याचा घाव खूप जोरदार असतो. कोणीही तो भरून काढू शकत नाही. पण आपण कसे ओळखू शकतो, की आपला पुढील काळ कसा येणार आहे? वेळ आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे खुले करेल की संकटाचे, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात सुद्धा उत्पन्न होत असतील. म्हणून आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा काही संकेतांबद्दल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या येणार्या सुखाच्या कालावधीची कल्पना येईल.

जेव्हा नारदमुनि वैकुंठधाम पोहोचले होते, तेव्हा त्यांनी भगवान श्रीहरी विष्णुंकडे या संकेतांबद्दल विचारणा केली होती. तेव्हा श्रीहरी विष्णुंनी त्यांना सांगितले की ते स्वत: मनुष्याना असे काही संकेत पोहोचवतात ज्यामुळे व्यक्ति आपल्या येणार्यां काळाबद्दल जाणून घेऊ शकतात. ते संकेत तुम्हाला प्रकृतीद्वारे, पशूपक्ष्यांद्वारे, शुभसंकेताद्वारे किंवा भक्तांकडून समजू शकतात. फक्त माणसाने ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल.

पहिला संकेत- जर तुमचे डोळे सकाळी ब्रम्हमुहूर्तावर उघडले, म्हणजे तुम्हाला झोपेतून जाग आली, व तुमच्या मनात ईश्वराचे स्मरण आले किंवा तुम्हाला असा भास झाला, की तुम्हाला कोणीतरी कोणत्यातरी दिशेला घेऊन जात आहे, तर समजून जा तुमच्यासाठी प्रगतिचे यशाचे नवीन मार्ग उघडत आहेत.

दूसरा संकेत- काही वेळेस तुमचे मन विनाकारण खूपच प्रसन्न राहाते, चेहरा हसरा व टवटवीत असतो, राग तुम्हाला येताच नाही, हे संकेत आहेत तुम्ही सदैव आनंदी राहाल. अशा वेळी आपण ज्याचा विचार करत नाही अशी खुशखबर मिळते. मन प्रसन्न राहाणे हा सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे.

तिसरा संकेत- जर तुमच्या घराच्या दरवाजात गोमाता वारंवार काहीतरी खायला येत असेल, माकड तुमच्या घरातून काहीतरी वस्तु उचलून नेत असतील, मांजर घरातच पिल्लांना जन्म देत असेल, पक्षी तुमच्या अंगणात सतत किलबिल करीत असतील, तर हा संकेत आहे, तुमचा येणारा काळ तुम्हाला बलवान बनवेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगतिच्या पदावर पोहोचू शकता.

चौथा संकेत- लहान मुलांमध्ये ईश्वर वास करीत असतो असे आपण सगळेच मानतो. छोटी कन्या किंवा बालक तुम्हाला बघून वारंवार हसत असेल, किंवा तुमच्या घरात त्यांचे आगमन होत असेल, तर हा शुभ संकेत आहे. तुमचे जीवन नवीन येणार्या आनंदाने भरणार आहे. हे संकेत ईश्वरकृपेने प्राप्त होतात.

पाचवा संकेत- काही कालावधीपासून चाललेले खर्च, अकारणयेणारी संकटे जर टळली व मिळकतीचे नवीन स्त्रोत आपल्याला मिळत असतील, तर या संकेताने समजून जा की तुमचा वाईट काळ संपत आला आहे व धन तुमच्या घरात जरूर टिकून राहाणार आहे व माता लक्ष्मीचे जरूर तुमच्या घरात आगमन होणार आहे.

सहावा संकेत- पूजेच्या थाळीमध्ये फूल, हार किंवा चंदनाचे पडणे, ईश्वराची मूर्ति तुमच्याकडे बघून हसत असेल असे वाटणे, घरात प्रिय व्यक्तीचे आगमन, घरात चांदी सोने येणे, हे सर्व शुभ मानले गेले आहे. हे सगळे संकेत येणारा शुभ कालावधीचा संकेत आहेत.

सातवा संकेत- सकाळी सकाळी तुम्ही घरातून काही शुभ कार्यासाठी निघालात व तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले, किंवा संत साधू, पुजारी यांचा आशिर्वाद प्राप्त झाला, तर हा शुभ संकेत आहे. याचा अर्थ हा आहे, की तुम्ही ज्या कामासाठी निघाले आहात, ते काम जरूर पूर्ण होईल. त्या कार्यात सफलता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

आठवा संकेत- संध्याकाळच्या वेळी, पाण्याने किंवा दुधाने भरलेले पात्र जर कोणाच्या द्वारे तुम्हाला प्राप्त झाले, किंवा गोड पदार्थ प्राप्त झाला तर तो शुभ संकेत आहे. तुमच्या बाबतीत असे काही घडत असेल तर नक्की कमेन्ट मध्ये लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *