३ दिवस दुधात उकळून प्या १०० वर्षांपर्यंत हाडांचा कमजोरपणा, निद्रानाश, थकवा, सांधेदुखी होणारच नाही…

मित्रांनो, काही दिवस तुम्ही हे प्या तर हातापायातील वेदना, हांडांच्या वेदना, गुडघेदुखी, हाडांचा कमकुवतपणा दूर होईल. रक्ताची कमतरता दूर होईल व त्याचबरोबर तुमच्या शरीरातील कॅल्शियमचा स्तर वेगाने वाढू लागेल. खूपच सोपा व परिणामकारक उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे, जो तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ देणार नाही. कॅल्शियमची पूर्तता करेल.

सांध्यातील वेदना, गुडघेदुखी, कंबरदुखी, मांसपेशींमधील वेदना या सगळ्याचे कारण आहे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता. हे कोणत्याही वयात होऊ शकते. असे जरूरी नाही की म्हातारपणी हे होते, कमी वयात देखील हल्ली या तक्रारी बघायला मिळतात. रक्ताची कमतरता असूदे, किंवा डोळ्यांचा त्रास असुदे ते दूर करेल हे ताकद देणारे पेय. हा उपाय करण्यासाठी मी सगळ्यात पहिले इथे बदाम घेतले आहेत. ४ बदाम घ्यायचे आहेत.

बदाम आपल्या हृदयासाठी, बुद्धीसाठी व शरीराच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहेत. मल्टी-विटामीन प्रमाणे काम करतो बदाम. डोळ्यांची दृष्टी उत्तम करतो, सुधारतो तसेच त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. आपले पचन सुधारतो आपल्याला तंदुरुस्त ठेवतो बदाम. तुम्हाला ४ ते ५ बदाम घेऊन पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. जेव्हा आपण भिजलेले बदाम खातो, तेव्हा त्यातील पोषक तत्वे वाढतात.

१ तासात बदाम पाण्यात भिजून जातो. बदामात विटामीन ई असते, प्रोटीन असते जे आपल्याला तरुण ठेवते. ६५च्या वयात २५चे दिसाल जर पाण्यात भिजवलेले बदामाचे सेवन केले तर. पूर्वीच्या काळचे लोक आजारी का पडत नसत कारण त्यांची सवय होती
की रोज सकाळी पाण्यात भिजवलेले ४ बदाम ते नेहमी खात असत. सकाळी साल काढून खात असत.

सालामध्ये ट्यानीन नावाचे तत्व असते, जे बदामाला योग्य रीतीने पचन होऊ देत नाही. म्हणून साल काढून बदाम खा. पचन चांगले होईल. आपली स्मरणशक्ती वाढवितो. आपली बुद्धी जर तीक्ष्ण असेल, तर आपण आपल्या जीवनात नक्कीच प्रगति करू शकतो. बदाम हे सुपरफूड मध्ये समाविष्ट आहेत. रोज बदामाचे सेवन केले तर खूप आजार दूर होतील.

शरीरातून विषारी तत्वे बदाम काढून टाकतो. मधुमेही लोकांसाठी चांगले आहे. तुमची त्वचा चांगली होते. केसांसाठी पण बदाम उपयोगी आहेत. दुसरी वस्तु आहे तीळ. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. बदाम व तीळ अशा या दोन वस्तु आहेत जे तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढवितात. तीळ हलके भाजून घ्या. तीळ रोज १ चमचा खाल्ले तर १०० मिलिग्राम कॅल्शियम तुमच्या शरीरास मिळते.

तीळामध्ये भरपूर प्रमाणात झिंक, मैग्ंनेशियम, फायबर असते. आपल्या हाडांसाठी, दातांसाठी, त्वचेसाठी तीळ सेवन करणे फायदेशीर आहे. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करते तीळ. आपली कमजोरी तीळ कमी करतात. आता तीळाची पाऊडर करून ठेवा. दुधात घालून तुम्ही तीळ घेऊ शकता पण दूध गरम घ्यायचे आहे.

बदाम तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घेऊन गरम दूध त्याच्याबरोबर घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आमची माहिती तुम्हाला आवडली तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *