फक्त १ चमचा तुळशीमध्ये टाका हि वस्तू, २ दिवसात तुळस होईल हिरवीगार…

आज मी तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आले आहे. तर चला मग बघूया काय आहे ती माहिती. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तुळशीच्या रोपांना तुम्ही केवळ २ दिवसात हिरवेगार कसे कराल. हे जे तुळशीचे रोप दिसते आहे ती मी तुळशीच्या मंजिर्‍यांपासून म्हणजेच बियांपासून लावले आहे. ज्याची माहिती मी तुम्हाला यापूर्वीच शेअर केली आहे. आता माझे हे झाड खूपच चांगल्या रीतीने वाढू लागले आहे.

तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचे तुळशीचे झाड कसे वाढवू शकता त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची पाने पिवळी पडत असतील, तर आपण काय केले पाहिजे. कशा प्रकारे आपण हे तुळशीचे झाड हिरवेगार व घनदाट बनवू शकता. खूपच सोपा उपाय आहे. तुम्हाला दिसत असेल, इथे छोटी छोटी रोपे दिसत आहेत. ही नवीन रोपांची सुरुवात आहे. तुळशीच्या ज्या मंजिर्‍या येतात त्या तुम्ही रोपाच्या बाजूला सगळीकडे टाकल्या तर लहान लहान रोपे येतील.

५ ते ६ दिवसात याची पाने याला सुरुवात होते. हे रामतुळस आहे व एक शामतुळस आहे. तुम्ही बघू शकता, एका तुळशीची पाने हिरव्या रंगाची आहेत तर दुसरीचि एकदम गडद हिरव्या रंगाची आहेत. तुळस दोन प्रकारची असते. शाम तुळशीला कृष्ण तुळस असेही म्हणतात. दोन्ही तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असतात. परंतु, जी कृष्ण तुळस असते, त्याचे आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे. खूप औषधांमध्ये तुळशीची पाने, त्याचा रस याचा उपयोग केला जातो. तुळशीच्या मुळांचा पण उपयोग केला जातो.

औषधाच्या रूपात तुळशीचा उपयोग केला जातो. चला तर मग बघूया याची काळजी आपण कशी घेऊ शकतो ज्यामुळे आपले झाड खूप चांगल्या प्रकारे हिरवेगार राहील व वाढेल. सगळ्यात पहिले तुळशीत जी सुकलेली पाने पडतात, किंवा जंगली वनस्पति उगवतात त्या आपण काढून टाकायच्या. सुकलेली पाने काढून टाका नाहीतर जंतुसंसर्ग होतो. कीड लागलेली पाने काढून टाका.

दूसरा उपाय तुळशीच्या झाडातील माती वरखाली करा. थोडी माती उकरा. त्यामुळे हवा खेळती राहाते. हलक्या हाताने करा. खूप जास्त पाणी तुळशीला घालू नका. आपण जे पाणी घालतो, ते जास्त झाले तर तुळशीची मुळे सडतात. थोड्या थोड्या दिवसात पाने दाबून टाका. (पिंचिंग करा). त्यामुळे नवीन नवीन फांद्या येतील. जेवढ्या फांद्या जास्त येतील तेवढे झाड घनदाट होतील. हे खूपच जरूरी आहे. ही पाने फेकून न देता, चहात घाला, किंवा काढा बनवा.

जर तुळशीत किडे लागले, तर त्यात कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे मारा. हे पाण्यात मिक्स करून सगळ्या तुळशीच्या रोपांना स्प्रे करा. म्हणजे तुळशीला रोग लागणार नाही. पिवळ्या पानांसाठी चांगले आहे, एब्सम सौल्ट. याचे नाव आहे मैग्ंनेशियम सल्फेट. अर्धा छोटा चमचा तुम्हाला स्प्रे करायचे आहे झाडामध्ये. त्यामुळे रोपांची मैग्ंनेशियमची कमतरता पूर्ण होईल. क्लोरोफिल वाढते. त्यामुळे पाने पिवळी पडत नाहीत. झाड हिरवेगार राहील.

माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.