श्रीकृष्ण म्हणतात या ४ सवयी जीवनातून गरीबी दूर ठेवतील…

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रानो, नेहमी आपण ज्या गोष्टी परत परत करतो त्याला आपण आपली सवय असे म्हणतो. सवयी पण २ प्रकारच्या असतात. चांगली व वाईट. आपल्या सवयींचा आपल्या स्वास्थ्यावर, व्यक्तित्व, वागणे, व्यवहार, राहणीमान, खाणेपिणे, या सर्वांवर खूप प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर आपले भाग्य त्यामुळे प्रभावित होते.

आपल्या सवयी जर चांगल्या असतील, तर निश्चितपणे आपली प्रगति होते व आपल्या जीवनावर पण त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल व त्याविरूद्ध वाईट सवयींचा आपल्या जीवानावर वाईट परिणाम होतो. आपण सगळेच आपल्या आराध्य देवी, देवतांची मनोभावे पुजा करण्याचे प्रयत्न करतो व नेहमी त्यांची कृपा प्राप्त व्हावी अशी इछा करतो व त्याप्रमाणे प्रयत्न पण करतो.

परंतु, आजकालच्या धावपळीच्या जीवनात खूप प्रयत्न करूनही आपण पूजेसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही व या गोष्टीचे दू:ख
आपल्या मनाला नेहमी त्रास देत असते. परंतु, मित्रांनो, ईश्वर कधीही कडक उपास करून किंवा अत्याधिक पूजा पाठ केल्यामुळे किंवा कोणत्या वस्तूचा त्याग केल्यामुळे प्रसन्न होत नाहीत, तर आपल्या चांगल्या वागण्यामुळे, चांगल्या कामांमुळे लवकर प्रसन्न होतात.

आपल्याला जर सच्च्या मनाने ईश्वराचे सान्निध्य जाणून घ्यायचे असेल,तर आपल्या दिनचर्येमध्ये आवश्यक बदल करायची आपल्याला जरूरी आहेव काही चांगल्या सवयी आपल्या जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे तुम्ही आपल्या आराध्य देवाला प्रसन्न करू शकता. जेव्हा ईश्वर आपल्यावर प्रसन्न होतात, तेव्हा आपल्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद आपोआप येतो. आपल्या आर्थिक स्थितिमध्ये सुधारणा होते. परिवारीक जीवनाशी संबंधित सगळ्या समस्या दूर होतात.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या अशा ४ सवयींबद्दल सांगणार आहोत, तुम्ही पुजा करा अथवा करू नका, पण या ४ सवयी आपल्या जीवनात नक्कीच अंगिकारा व उन्नतीच्या मार्गावर प्रस्थान करा. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ४ सवयी.

पहिली गोष्ट- मित्रांनो, ईश्वरपेक्षा जास्त मोठे कोण असू शकते. म्हणून सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले आपल्या आराध्य देवाचे स्मरण केले पाहिजे. आपल्या परिवाराची सुख शांति व समृद्धिसाठी आपल्यावर देवतांची कृपा असणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला रोज पूजा करण्यासाठी वेळ नसेल, तरी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण रोज केले पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी केले पाहिजे. कुलदेवतेचा मंत्रोच्चार करा. तुळशीच्या झाडाशी एक दिवा जरूर प्रज्वलित केला पाहिजे. या एका सवयीमुळे तुमच्या परिवारावर कुलदेवतेचा आशिर्वाद कायम राहातो.

दुसरी गोष्ट- आपल्या शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की सकाळी स्नान न करता स्वयंपाकघरात प्रवेश करणे अनुचित असते. परंतु, आताच्या काळात प्रत्येक परिवारात हे संभव नाही. म्हणून कमीत कमी नित्यकर्म झाल्यानंतर स्वछ हात, तोंड धुवून स्वयंपाकघरात जा व गॅसवर काहीही बनवायच्या आधी त्याला नमस्कार जरूर करा. असे यासाठी करायचे आहे, की त्यामुळे अग्निदेवाबरोबरच माता अन्नपुर्णेचा आशिर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, की अन्नाचा कधीही अपमान करू नका.

तिसरी गोष्ट- मित्रांनो काही अशा गोष्टी आहेत ज्याला आपण आपल्या स्वभावाचा एक भाग बनविला तर आपण ईश्वराला प्रसन्न करू शकतो त्याचबरोबर आपल्या मनात एक आनंद व संतुष्टता ही भावना येते. जीवनात सकारात्मकता वाढते. जसे अकारण अशा शब्दांचा प्रयोग करू नका ज्यामुळे कोणाला वाईट वाटेल. विनाकारण कोणाचा अपमान करू नका. आपल्या वडीलधार्यांेना अपशब्द बोलू नका. घरातील महिलांची सुरक्षा व सन्मान हे लक्षात ठेवा. घरी आलेल्या गरजू व्यक्तिला मदत करा. पशुवर अत्याचार करू नका. अशी सवय लावून घ्या.

चौथी गोष्ट- मनुष्याला चालताना नेहमी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे की त्याच्या पायाखाली छोट्या जीवांचा मृत्यू होऊ नये. जेव्हा घरातून बाहेर पडाल, तेव्हा देवाचे नाव घेऊन बाहेर पडा. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.