एक चिमूटभर हळद तुमचे आयुष्य बदलून देईल, लग्न जमेल, पैसा सुख समाधान मिळावे…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो हळदीला आयुर्वेदात खुप महत्त्व आहे. तसेच पूजेमध्ये देखील अत्यंत महत्व आहे आणि या हळदीचा वापर करून आपल्या आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती त्याचप्रमाणे पैसा भरपूर मिळवू शकतो आणि आपल्या आयुष्यातील सहज दूर करू शकतो. यासाठीच आज आपण छोटे छोटे दहा उपाय पाहणार आहोत.

तुम्ही हे उपाय करा, तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. पहिला उपाय असा आहे, पूजेनंतर कपाळावर हळदीचे तीळक केल्याने विवहा संबंधी सर्व कार्यात यश येते. एखाद्याला विवाहाच्या संबंधी अडचण असेल तर त्याने पूजेच्या नंतर कपाळावर हळदीचा तिळक लावायचा. दर गुरुवारी जर गणपतीला चिमूटभर हळद वाहिली विवाहाच्या सर्व अडचणी दूर होतात आणि सहज विवाह जमतो.

भगवान विष्णू आणि लक्ष्मी च्या मागे हळदीची पूड जर लपवून ठेवली तर विवाहाच्या सर्व समस्या दूर होतात आणि लवकर लग्न जमते. त्याचप्रमाणे काही अडचणी असतील, ग्रह असतील तर ते संपतात. सूर्याला अर्ध देत असताना जे पाणी घेतात त्यामध्ये हळद मिसळली तर सामान्यपणे घरातील कटकटी, अडचणी दूर होण्यास मदत होते.

अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ केली तर शरीर आणि मन शुद्ध होते आणि तुमचे जे करियर आहे, ज्यात तुम्ही काम करत आहात त्या कामात मोठया प्रमाणात यश मिळते. म्हणून शक्यतो अंघोळीनंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळायला विसरू नका.

हळद दान करणे हे देखील शुभ मानले गेले आहे आणि आरोग्यासंबंधी समस्या दूर करायच्या असतील, ग्रह अनुकूल करायचे असतील तर आपण हळद दान करायला पाहिजे. हळदीची गाठ म्हणजे आख्खी हळद कुंडावर लाल दोरा बांधून डोक्याशी ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाहीत.

तसेच आपल्या आसपास नकारात्मक शक्ती न येता माणूस शांत आणि निवांत झोपतो. त्याचप्रमाणे आयुष्यात यश आणि संपत्ती मिळते. तसेच घराची सीमारेषा असते त्यावर हळद ठेवली तर घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही व घरात सुख आणि शांती टिकून राहते.

हळदीमुळे जेवणात संपन्नता येतच तसेच हळदीचा वापर जेवण आणि जीवनात असेल तर आपल्या आयुष्यात घेतलेला निर्णय सहज शक्य होतो. जपाची जी माळ आहे तिला हळद लावून जप केला तर बुद्धी चांगल्या प्रमाणात वाढते. याच हळदीची जर रोज सकाळी लक्ष्मीला चिमूटभर वाहिली तर आपल्या आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती तसेच सर्व गोष्टी मिळतात. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *