रोज रात्री जेवणानंतर पाण्यासोबत हे प्या, पोटाची चरबी मेणबत्तीसारखी वितळेल…

मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर अशा एका ड्रिंक म्हणजेच पेयाची रेसीपी शेअर करणार आहे जे तुम्ही काही दिवस सतत घेतले तर तुमची वाढलेली चरबी किंवा पोट जे चरबिमुळे फुगलेले आहे, ते योग्य आकारात करू शकता. काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक तत्वे नसलेले फूड खातो, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते, जे आपल्याला आवडत नाही.

मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याचा तुम्हाला १०० टक्के फायदा मिळेल. हे पेय तुम्ही सतत काही दिवस घेणे गरजेचे आहे., ज्यामुळे तुमचे लटकणारे पोट कमी होईल. मी सगळ्यात पहिले घेतले आहे लिंबू. घरातील वस्तु वापरुन आपण हा उपाय तयार करणार आहोत. लिंबू तर आपल्याकडे असतेच. केवळ तुम्हाला एका लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबू मोठे असेल, तर अर्धेच लिंबू घ्या.

लिंबू आपल्या शरीराला टोक्सिन म्हणजेच विषारी द्रव्यांपासून वाचविते. ते विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकते. त्याचप्रमाणे लिंबामुळे आपले वजन कमी करण्यास खूप मदत होते. खूपच उत्तम असे हे ड्रिंक आहे जे तुम्ही काही दिवस घेतले तर तुम्हाला स्वत:ला फरक जाणवेल. एका आठवड्यात तुम्हाला जाणवेल, की तुमचे लटकलेले पोट आहे, ते पूर्ववत होते आहे.

सगळ्यात पहिले मी लिंबाचा रस काढून घेते. हे पेय तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचे आहे. सकाळी जेवणाआधी किंवा जेवणानंतर घेऊ शकता. तुम्हाला हे पेय गरमच प्यायचे आहे. आता मी इथे आले घेतले आहे. त्याची साले काढून मी पातळ तुकडे करते आहे. आता तुम्हाला जिंगर वॉटर बनवायचे आहे. आले आपल्या पचनास मदत करते. जर आपण आल्याचे पाणी प्यायले तर पचन चांगले होते.

आपले पचन चांगले असेल, मेटाबोलीसम चांगले असेल, तर आपण जे काही खातो ते पचेल व त्याचे चरबीत रूपांतर होणार नाही त्याची ऊर्जा बनेल. आता १ ग्लास पाणी गरम करत ठेवा., जसे पाणी गरम झाले की आल्याचे तुकडे त्यात टाका. मंद गॅसवर आले पाण्यात उकळायचे आहे. आल्याच्या पाण्याने भूक नियंत्रित होते त्यामुळे आपण जास्तीचे खाणे खात नाही. जरुरीपेक्षा जास्त खाल्ले तर वजन वाढते.

आता हे पाणी चांगले उकळले आहे. आता हे पाणी गाळून घ्या. आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबू नैसर्गिक ब्लीच आहे. आता आपल्याला त्यात घालायचा आहे मध. मध वजन कमी करण्यासाठी मदत करतो.

तुम्ही हे ड्रिंक दिवसातून दोनदा घ्या व फरक बघा. नक्की तुमचे वजन व लठ्ठपणा कमी होईल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *