गरिबी आणि दारिद्य येण्यापूर्वी जीवनात घडतात या गोष्टी, आताच जाणून घ्या तुमच्या घरी ही कामे होतात का ?- चाणक्यनिती

मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल, तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, घरात होणार्‍या छोट्या छोट्या गोष्टीत काही संकेत दडलेले असतात. ते संकेत जर समजून घेतले, तर आपल्याला समजू शकते, की भविष्यात येणारा कालावधी कसा असेल व संकटांपासून आपण वाचू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते, तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सूचना देतात.

आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की गरीबी किंवा दारिद्र्य वाढण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. जर घरात काही अडचण किंवा समस्या येणार असेल, तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम घरातील तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड एकदम सुकून जाते. ज्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येऊ शकते. खाण्यापिण्याच्या गोड वस्तूंवर काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या येणार्‍या वाईट वेळेकडे संकेत करते.

जर तुमच्या घरातील झाडांची पाने सुकू लागली, तर ती कापून टाका. घरातील झाडे किंवा रोपे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत. घरातील झाडांची पाने सुकता कामा नयेत. नाहीतर बुध ग्रह खराब होतो व त्यामुळे तुमच्यावरील कर्ज वाढते. झाडांना रोज पाणी जरूर द्या. घरातील झाडू हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. कारण झाडू घरातील दारिद्र्य बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख समृद्धि व धन दौलत येते. झाडूच्या वर पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो.

घरातील कोणताही लहान मुलगा जर अचानक घरात केर काढू लागला., तर घरात कोणीतरी आगंतुक पाहुणा येणार आहे हे समजावे. सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये, कारण तो व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देतो. सकाळी नाश्ता करण्याआधी केर जरूर काढावा. हे शुभ असते. झाडू उलटा करून ठेवणे हे अपशकुन मानले जाते.

झाडूला नेहमी आडवे झोपवून ठेवावे, झाडू उभा ठेवल्यामुळे घरात कलह वाढतो. अंधार पडल्यावर झाडू मारू नका. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. घरातील सदस्य बाहेर गेला की लगेच केर काढू नये. झाडू लपवून ठेवा, कोणाच्या नजरेत येऊ देऊ
नका. जसे आपण धन लपवून ठेवतो, तसाच झाडू लपवून ठेवा. कोणाच्या नजरेस पडू देऊ नका.

वास्तुविज्ञानानुसार, जे लोक झाडूसाठी एक स्थान ठेवत नाहीत, कुठेही ठेवून देतात, त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते. त्यामुळे खर्च वाढतो. मित्रांनो, गाय किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुष्ट होऊन निघून जाते. ज्या घरात दूध उकळून खाली सांडते, त्यांच्या घरात पैशाचा खर्च वाढतो, घरातील लोक आजारी पडतात.

नात्यांमध्ये दुरावा वाढतो. ह्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. खूप लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे शुभ आहे. पण आम्ही सांगू इछितो, की रोज दूध उकळून सांडत असेल, तर ते शुभ नाही. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात आहात, व घरी येताना तुम्हाला दरवाजात तुम्हाला पालीचे दर्शन झाले, तर त्याचा अर्थ आहे, तुमचा वाईट कालावधी लवकरच सुरू होणार आहे.

अशावेळी, तुम्ही सावध राहिले पाहिजे. वेळ कधीही एकसारखी नसते, जरूरी आहे तुम्ही धैर्य ठेवण्याचे. मित्रांनो, घरात पाल दिसणे, शुभ संकेत आहे. पण नवीन घर घेतले आहे व त्यात पाल मेलेली दिसली, तर पूजा केल्याशिवाय घरात प्रवेश करू नका. तसे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगति होत नाही. पाल जर तुमच्या डोक्यावर पडली, तर तुमच्यासाठी धनलाभाचे संकेत आहेत.

जर पाल तुमच्या केसांवर पडली, तर त्याचा अर्थ तुमच्या जीवनात मोठे संकट येणार आहे. डोळ्याची फडफड पण संकेत देते. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे. महिलांचा उजवा डोळा फडफडणे वाईट संकेत आहे. पुरुषांचा डावा डोळा फडफडणे हा मेहनत करण्याचा कालावधी आहे. उजवा डोळा फडफडणे हा शुभ संकेत आहे. कावळा पण तुम्हाला येणार्‍या कालावधीचा संकेत देतो. महिलेच्या डोक्यावर कावळा बसणे हा संकटाचा संकेत आहे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.