तुमच्या तळहातावर अर्धा चंद्र आहे का? जाणून घ्या महत्व…

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नवीन काही शिकायचे असेल, तर पेजला लाईक जरूर करा. भारतीय संस्कृतीमध्ये भविष्य बघण्यासाठी काही विधी सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये सामुद्रिकशास्त्र भविष्य बघण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णुपुराणात वर्णन केलेल्या एका कथेनुसार हे शास्त्र माता लक्ष्मीने भगवान विष्णुंना सांगितले होते आणि भगवान विष्णुंनी ते ऐकून त्या शास्त्राचा प्रसार केला होता.

म्हणून या शास्त्राला सामुद्रिकशास्त्र असे म्हणतात. हातांच्या रेषा, पर्वत, नखांची ठेवण व विभिन्न चिन्ह यांच्या गहन अध्यायनाने या विद्येचा विकास झाला आहे. सामुद्रिकशास्त्रामध्ये शरीरावरील तीळ आणि निशाण यांचे खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे हातावरील विभिन्न रेषा जसे भाग्य रेषा, मस्तीष्क रेषा, हृदय रेषा, मंगल रेषा इत्यादि रेषांशिवाय चिन्ह, शंख, चक्र, मंदिर, स्वस्तिक, हाताचे आकार, मनुष्याचा भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ व मनुष्याचा स्वभाव व व्यक्तीत्व याबद्दल माहिती कळते.

तसेच बोटांची लांबी, आकार, नखांवरील चिन्ह यावरून व्यक्तीची शारीरिक स्थिति व भविष्याची माहिती होते. आजच्या या माहितीमध्ये आम्ही हातावर आढळणारे काही विशेष चिन्ह जे छोट्या रेषांनी बनतात त्याचे महत्व बघणार आहोत. तसेच आपल्या नखांवर जे अर्धचंद्राकार आकृती होते, त्याचा अर्थ पण समजून घेऊया. प्रथम जाणून घेऊया हातावर बनलेल्या चिन्हाविषयी. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

ज्या लोकांच्या हातावर शंखाचे चिन्ह असते, ते निश्चित रूपाने धनवान बनतात. असा लोकांना जीवनात धनाची कधीही कमतरता पडत नाही. त्याचा स्वभाव दृढनिश्चयी असतो. तसेच, हाताच्या पंजावर माशाचे चिन्ह असणे हे सौभाग्याचे व ऐश्वर्याचे प्रतिक असते. काही लोकांमध्ये हाताच्या पंजावर असे लहानपणापासूनच असते. पण काही लोकांमध्ये अर्धे आयुष्य गेल्यावर असे चिन्ह निर्माण होते व त्यांचे भाग्य उदयास येते.

दुसरी गोष्ट ज्या लोकांच्या हातावर मंदिरासारखे चिन्ह बनते, ते नेहमी समाजात मान-सन्मान व किर्ति मिळवितात. असे लोक बसतात एका जागी, पण माहिती त्यांना सगळ्या आजूबाजूच्या लोकांची असते. म्हणून, कोणी अडचणीत असेल, तर सल्ला मागायला याच लोकांकडे येतात. कारण हे लोक बुद्धिमान असतातच पण त्याव्यतिरिक्त ते चांगले मार्गदर्शक असतात.

तिसरी गोष्ट म्हणजे चरित्रवान व धार्मिक प्रवृतीच्या लोकांच्या हाताच्या पंजावर ध्वजाचे चिन्ह असते. स्वस्तिक हे चिन्हसुद्धहा शुभ मानले जाते. ते दयाळूपणा, सात्विकता याचे प्रतिक आहे. चौथी गोष्ट म्हणजे भाला, त्रिशूल असे चिन्ह बहादुर आणि वीरता असलेल्या माणसाच्या हातावर आढळतात.

चला आता बोलूया हाताच्या पंजावर आढळणारी पर्वतांची चिन्हे- पहिले म्हणजे आपल्या कुंडलीत ज्या ग्रहाची स्थिति मजबूत व शुभ असते, त्या ग्रहाच्या पर्वताची ऊंची जास्त असते. त्या पर्वतावर काही शुभ चिन्ह तयार होतात व त्या बोटाची ऊंची बाकीच्या बोटांपेक्षा जास्त असते. जर कोणत्या व्यक्तीचे अनामिका बोट मोठे असेल, तर त्या व्यक्तीची रवि पर्वत ऊंची जास्त असते व त्यावर शुभ चिन्ह असेल. असा व्यक्ति प्रसिद्ध तसेच गुणवान असतो.

दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीच्या हाताच्या पंजावर शनि पर्वताची ऊंची जास्त असते, ते अनुशासनप्रिय आणि यथार्थवादी असतात. जर गुरु पर्वताची ऊंची जास्त असेल, तर त्या व्यक्तीची राजनीति, नौकरी, व्यवसाय यामध्ये सफल होते. जर शुक्र पर्वताची ऊंची जास्त असेल, तर अशी व्यक्ति संगीत किंवा कला क्षेत्रात उन्नती प्राप्त करतात. बुध प्रभावाची व्यक्ति बौद्धिक क्षेत्रात प्रगति करतात. मंगळ प्रभावाच्या व्यक्ति प्रशासनिक सेवेत जातात.

चला आता बघूया आपल्या नखांवरील अर्धचंद्राचा अर्थ- नखांवर अर्धचंद्र- ही सगळ्या बोटांवर आढळत नाही. नखांवरील अर्धचंद्र आकृती शुभ असते. अनामिकेवर जर अर्धचंद्र असेल, तर अशा व्यक्तींना मान-सन्मान मिळतो. तसेच अशा व्यक्तींच्या जीवनात धन वृद्धी होते. भाग्य बलवान असते. ज्या लोकांच्या मध्यमा बोटावर अर्धचंद्र असतो ते व्यापारात उत्तम प्रगति करतात. हे बोट शनिदेवाचे मानले जाते. ज्या लोकांच्या कोणत्याही नखांवर असे आकार नसतात, त्या व्यक्ति रागीट असतात. त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात, प्रत्येक बाबतीत सफलता मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *