एक तुकडा यासोबत खा, सकाळी कोठा 2 मिनिटांत साफ, वारंवार पाद, अपचन गॅसेस कमी…

नमस्कार, मित्रांनो. मी दिवसांपूर्वी मी एक माहिती दिली होती, पोटाच्या वेदना कमी करण्याबद्दल. ती तुम्हाला खूप आवडली होती. तुम्ही मला कळवले होते की तुमच्या पोटातील वेदना त्या उपायाने कमी झाल्या होत्या. तर आज मी तुमच्यासाठी खूपच साधा व सरळ उपाय घेऊन आलो आहे. हा तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे.

पोटातील गॅसवर हा रामबाण उपाय आहे. तुमच्या पोटात कितीही गॅस तयार झालेला असुदे, किंवा अॅसिडिटी असेल तर लवकर नाहीशी होते. माझी ही माहिती तुम्ही पुर्णपणे वाचा. आवडली तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. ही माहिती कोणत्याही एलोपेथी औषधापेक्षा कमी नाही.

जर तुम्ही वारंवार गॅस झाल्यावर एलोपेथी औषधे सेवन करीत असाल, तर आपल्या लिव्हरला ती नुकसान करतात. त्याचबरोबर अन्य आजारांना आमंत्रण देतात. चला सुरू करूया हा उपाय कसा तयार करायचा आहे.

हा साधा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे घ्यायचे आहे आले. आल्यामध्ये मित्रांनो, पाचक एंझाइन असते. जे पोटात होणार्‍या गॅस, अपचन या समस्येपासून सुटका करते. पोटात गॅस बनला आहे, अॅसिडिटी आहे तर आले खूपच सहजपणे गॅसची समस्या दूर करते. मी दाखवतो आहे तेवढा तुकडा आले घ्या, साधारण १ इंच. त्याची साले चाकूच्या मदतीने काढून घ्या.

नंतर त्या आल्याच्या छोट्या छोट्या चकत्या कापा मी केल्या आहेत त्याप्रमाणे. आता तुम्हाला इथे घ्यायचे आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ आपली पचनशक्ती वाढवते. त्याचबरोबर त्याचे पोटासाठी अनेक फायदे आहेत. अशा प्रकारे सैंधव मीठ आपल्या बोटावर घ्या. ते आल्याच्या तुकड्याला लावा.

दोन्ही बाजूला सैंधव मीठ लावून घ्या. नंतर हे आले तोंडात ठेवून त्याचा रस तोंडात येईल अशा रीतीने चावून चावून चोखा. म्हणजे त्यातील रस तुमच्या पोटात सैंधव मिठासोबत जाईल. १ तुकडा संपला की तुम्ही दूसरा तुकडा त्यावर पण मीठ लावून चोखा.

२ ते ३ चकत्या चोखून व चावून झाल्यावर तुम्हाला अनुभव येईल की पोटातील गॅस निघून जाईल. एकदा हा प्रयोग जरूर करा. तुम्हाला जर हे करताना तहान लागली, तर थंड पाणी न पिता कोमट पाणी प्या. तुम्हाला ही माहिती नक्की आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *