गरिबी व दरिद्रता येण्याचे हे असतात संकेत, आत्ता चेक करा तुमच्या घरात ही कामे होतात का?

आपल्यावर, आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरावर जेव्हा एखादं संकट येणार असेल, एखादी वाईट घटना घडणार असते तर या वाईट गोष्टी घडण्यापूर्वी आपल्याला काही लहान सहान गोष्टी नक्की घडतात. या गोष्टी संकेत देतात येणार काळ वाईट असणार आहे स्वतःचा बचाव करा. मित्रांनो असे संकेत आपल्याला वेळीच समजले तर आपण आपला आणि आपल्या कुटुंबांचा जीव वाचवू शकतो. एखाद्या संकटातून आपण स्वतःला सावरू शकता. असे कोणते संकेत असतात आणि या संकेतांचा नक्की अर्थ काय असतो ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या घराच्या छतावर जर खूप मोठ्या प्रमाणात कावळे एकत्र येऊ लागले, केवळ छतावरच नव्हे तर आपल्या आसपास जर वारंवार कावळे एकत्र येऊ लागले, मोठमोठ्याने काव काव असा आवाज करू लागले तर लक्षात घ्या. आपल्या घरावर, आपल्या वास्तुवर खूप मोठं संकट कोसळणार आहे. आपण सावधगिरी बाळगायला हवी. सोबतच आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया असतात, त्यांच्या डोक्याला जर कावळाने स्पर्श केला तर अशा स्त्रिच्या पतीवर एखादं मोठं संकट येऊ शकते.

आपल्या घरात काचेची भांडी किंवा चिनी मातीची जी भांडी असतात. ही जर वारंवार फुटू लागली, तडकू लागली तर हा सुद्धा संकेत असतो की घरातला पैसा बाहेर जाणार आहे. घरातली लक्ष्मी बाहेर पडणार आहे आणि घरामध्ये दरिद्रेचा, गरिबीचा वास निर्माण होणार आहे. आता याची कारणं ही अनेक असू शकतात. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही कारणे वेगळी असू शकतात. मात्र आपण या ठिकाणी गरिबीच्या दिशेने संकेत मानू शकता.

मित्रांनो पालीच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट. जर तुम्ही एखादी नवी वास्तू विकत घेतली आहे, नवीन फ्लॅट विकत घेतला आहे किंवा घर विकत घेतले आहे तर ही वास्तू विकत घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करू लागता त्यावेळी जर आपल्या घरामध्ये वास्तूत एखादी मेलेली पाल आढळून आली तर हा एक अत्यंत अशुभ संकेत असतो की हे घर किंवा ही वास्तू आपल्यासाठी अशुभ ठरू शकते. अशा वेळी आपण करणार काय? आपण खरेदी तर अगोदर केलेली असते. अशावेळी त्या वास्तूमध्ये पूजा, हवन या गोष्टी आपण नक्की करून घ्या. सत्यनारायण वगैरे व्यवस्थित घालून घ्या. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

मित्रांनो तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला घराबाहेर पडल्यानंतर ते काम करून तुम्ही घरामध्ये परत येता. तर घरात आल्यानंतर किंवा घरामध्ये प्रवेश करताना घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला एखादी पाल दृष्टीस पडली. लक्षात घ्या तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडला होता आणि पुन्हा घराकडे येताना, घरात प्रवेश करताना मुख्य दरवाजावरती किंवा मुख्य जी चौकट आहे त्या ठिकाणी पाल दृष्टीस पडली तर हा सुद्धा एक अशुभ संकेत असतो. की येणाऱ्या भविष्य काळात तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे. आपण सावध राहायला हवे.

अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही मात्र वारंवार असे अशुभ संकेत मिळू लागतील तेव्हा आपोआप या गोष्टींवर तुमचा विश्वास दृढ होईल. मित्रांनो पालीच्या बाबतीत, पालीला लक्ष्मी म्हटले जाते हीच पाल आपल्या डोक्यांवरती पडली तर खूप मोठं संकट हे आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती येऊ शकते. अनेकदा संकट येण्यापूर्वी आपल्या घरातील महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांचा डोळा हा फडफडू लागतो. महिलांच्या बाबतीत त्यांचा डावा डोळा जर फडफडत असेल तर तो शुभ असतो. काहीतरी शुभ बातमी, काहीतरी शुभ घटना घडणार असते.

मात्र महिलांचा उजवा डोळा जर फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं, अपशकुनी मानलं जातं आणि घरावरती कोणतं ना कोणतं संकट येणार हे याच सुचक असते. पुरुषांच्या बाबतीत उलट आहे, पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे हे शुभ मानलं जातं. काहीतरी शुभ बातमी त्यावेळी प्राप्त होते. मात्र ते पुरुषांच्या डाव्या डोळ्यांच्या बाबतीत घडलं, डावा डोळा जर फडफडला तर अशा पुरुषाच्या जिवनामध्ये अत्यंत कष्ट आणि त्रास हे त्या पुरुषाला सहन करावे लागू शकतात. आपल्या घरातला जो झाडू असतो तस तर झाडूला लक्ष्मी स्वरूप मानण्यात आले आहे.

मात्र हा झाडू अनेक प्रकारचे संकेत आपल्याला देऊन जातो. आपल्या घरातल लहान मूल जर अचानक झाडू घेऊन झाडलोट करू लागलं, झाडून घेऊ लागलं तर एखादी अप्रिय अतिथी म्हणजे तुम्हाला असे पाहुणे तुमच्या घरात येऊ शकतात की जे यावेत असे तुम्हाला वाटत नाही. ते तुम्हाला अप्रिय असतात. तर अशा प्रकारचे अप्रिय अतिथी तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास संभवतो. मित्रांनो हिंदूधर्म शास्त्र असं मानते की सूर्यास्तानंतर आपण झाडलोट करू नये, झाडूचा वापर करू नये. कारण त्यामुळे दुर्भाग्य प्रबळ बनते.

आपल्या नशिबामध्ये दुर्भाग्यचा फेरा निर्माण होतो. एका मागोमाग एक अशुभ गोष्टी घडू लागतात. अनेकजण झाडूला उभे करून ठेवतात किंवा उलटा लटकवून ठेवतात. तो सुद्धा अपशकुन असतो आणि अशा घरामध्ये वारंवार भांडणे होणे, कलह होणे, दारिद्रता यासुद्धा गोष्टी येऊ लागतात. वारंवार अशा प्रकारच्या चूका आपण करू नयेत. अंधार पडल्यानंतर आपण झाडूणे झाडलोट केली तर लक्ष्मी नाराज होते, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही.

एक नियम अत्यंत महत्वाचा आहे घरातून कोणतीही व्यक्ती घराबाहेर पडते एखाद्या विशिष्ट कामासाठी तेव्हा लगोलग त्या व्यक्तीच्या पाठोपाठ झाडून काढू नका, झाडू मारू नका. ते अत्यंत अशुभ असतं. घरातील झाडू कुठेही ठेवणे, त्याला लाथ मारणे या गोष्टी सुद्धा अशुभ मानल्या जातात आणि त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते. झाडूची निश्चित अशी एक जागा असावी, वारंवार त्याची जागा बदलू नका त्यामुळे सुद्धा घरात पैसा टिकत नाही. ज्याप्रकारे आपले धन, वैभव, पैसा लपवून ठेवतो, सोनं नान लपवून ठेवतो त्याचप्रकारे तोसुद्धा लपवून ठेवावा बाहेरच्या लोकांपासून.

बाहेरच्या लोकांची दृष्टी, नजर ही आपल्या झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरामध्ये कुठेही झाडू पडला असेल, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दृष्टीस पडत असेल तर अशा वेळी धन हानी मोठ्या प्रमाणात होण्याचे प्रमाण असतात. मित्रांनो खूप मोठा संकेत असतो, आपल्या अंगणात जे तुळशीचे रोपट असतं जेव्हा घरावरती खूप मोठं संकट येणार असतं, एखादी अशुभ घटना घडणार असते तेव्हा सर्वात आधी हे तुळशीचे रोपटे सुखते.

सोबतच अनेकदा असे दिसून आले आहे की आपल्या अंगणामध्ये जी रोपटी लावलेली असतात, जी झाडं असतात किंवा परस बागेमध्ये जी झाडे असतात यातील काही झाडं ही आपोआप सुखु लागतात. तर अशा प्रकारे घटना घडू लागल्या तर तुळशीचं सुखलेलं रोपटं हे उपटून त्या जागी नवीन रोपटं अवश्य लावा आणि तुमच्या बागेतील इतर काही सुखलेली रोपटी आहेत त्यांना पाणी वगैरे घालून टवटवीत करण्याचा प्रयत्न करा.

टवटवीत होत नसतील तर ती तात्काळ उपटलेली चांगली. कारण ही रोपटी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. मित्रांनो तुमच्या घरामध्ये एखादा खारट पदार्थ असेल तर या खारट वस्तू मध्ये काळ्या मुंग्या जर पडू लागल्या तर हा सुद्धा खूप मोठा संकेत असतो की लवकरच तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे. तर मित्रांनो असे अनेक संकेत या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतात. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *