विटामीन ई कॅपसुल्सचे हे फायदे जाणल्यावर तुम्ही सुद्धा दंगच व्हाल…

आज आम्ही तुम्हाला विटामीन ई कॅपसुल्सबद्दल सांगणार आहोत. या कॅपसुल्स केस आणि आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. या कॅपसुल्सच्या योग्य वापराने तुम्ही सुरकुत्यापासून वाचू शकता तसेच भेगा पाडलेल्या ओठांना मुलायम करू शकता, डोळ्याखालची काळी वर्तुळे ठीक करू शकता, तसेच स्ट्रेच मार्क्सना पण सहजपणे दूर करू शकता. एवढेच नाही तर अजून कितीतरी फायदे आहेत विटामीन ई कॅपसुल्सचे.

आज आपण या माहितीमध्ये या कॅपसुल्सबद्दल सांगणार आहोत. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत जरूर बघा. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर सगळ्यात प्रथम लाइक बटन दाबा. विटामीन ई कॅपसुल्सची एक स्ट्रिप साधारण २० रुपयाला तुम्हाला मिळते. ही तुम्हाला कोणत्याही मेडिकलस्टोरमध्ये मिळू शकते. तुम्हाला इतकेच करायचे आहे, की एक कॅपसुल घ्या. स्वच्छ धुतलेल्या हाताने एक पिन घ्या व याप्रकारे ती फोडा, त्याचे जेल एका चमच्यात किंवा वाटीत काढून घ्या. तुम्ही थेट हे जेल त्वचा किंवा केसांमध्ये लावू शकता.

पाहिजे असेल, तर त्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्या त्यामुळे ते लावायला सोपे होईल. जर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरणार नसाल, तर यामध्ये कोणतेही तेल तुम्ही मिसळू शकता. विटामीन ई मध्ये आढळणारे अॅंटी-ओकसिडेंट्स आपल्या त्वचा व केसांसाठी खूपच फायदेशीर असतात.

हयाच्या सौदर्यवर्धक फायद्यांमुळे आजकाल पार्लरमध्ये सुद्धा फेशियल, मैनिक्युअर, हेयर ट्रीटमेंट यासाठी विटामीन ई कॅपसुल्सचा वापर केला जातो. तर चला तुम्हाला सांगतो की ह्या कॅपसुल्स तुम्ही कोठे व कशा प्रकारे वापरू शकता.

ओठांसाठी: जर तुमचे ओठ फाटलेले, भेगा पडलेले असतील, तर त्यांना ठीक व मुलायम बनविण्यासाठी विटामीन ई कॅपसुल्स फायदेशीर आहेत. आपले ओठ प्रथम स्वछ पाण्याने धुवून घ्या. नंतर विटामीन ई कॅपसुल्सच्या जेलने त्याला मसाज करा. बदाम तेलात मिसळून लावले तर चांगले. रात्री झोपायच्या आधी लावले तर खूप फायदा होईल. तुमचे ओठ सुंदर आणि गुलाबी रंगाचे होतील.

चेहर्‍यासाठी: विटामीन ई ज्याला स्कीन विटामीन म्हटले जाते. यामध्ये त्वचा निरोगी करण्याचे खूप गुणधर्म आहेत. जेवढ्या म्हणून तुमच्या त्वचेच्या समस्या असतील, म्हणजेच, मुरूमे, दाग काळसरपणा, काळी वर्तुळे हे सगळे विटामीन ई कॅपसुल्सने ठीक करू शकता. हे आपल्या त्वचेला मौश्चराईज करते आणि हायड्रेटेड ठेवते.

यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट्स खूप प्रमाणात असतात, त्यामुळे मृत त्वचेला हे काढून टाकतात. सुरकुत्यांपासून तुमची सुटका करते. सुरकुत्या जाण्यासाठी तुम्ही २ कॅपसुल्स घेऊन त्यात १ चमचा दही मिसळा, १ चमचा मध व १ चमचा लिंबू रस हा मास्क बनवून अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवा. नंतर चेहरा स्वछ धुवा. आठवड्यातून एकदा हे जरूर करा. तुमचा चेहरा उजळून निघेल.

डोळ्यांसाठी- डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतात, त्यासाठी विटामीन ई कॅपसुल्स व क्रीम यांचे मिश्रण डोळ्याखाली लावा. त्यामुळे काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसेल. केसांसाठी- ह्या कॅपसुल्समुळे केस मजबूत होतात. कोंडा नाहीसा होतो. केस गळती थांबते. नखांसाठी- खूप मुलींना नखे वाढवायला आवडतात. पण काम करताना ती तुटू शकतात. ती मजबूत होण्यासाठी विटामीन ई कॅपसुल्स व बदाम तेल एकत्र नखावर लावू शकता.

स्ट्रेच मार्क- प्रसूतीनंतर ही समस्या होते. त्यासाठी नारळ तेल व ई विटामीन कॅपसुल्स यांचे मिश्रण मार्कवर लावा त्यामुळे दाग जातील. टाचा- टाचाना पडणार्‍या भेगा नाहीशा होण्यासाठी बदाम तेलात विटामीन ई कॅपसुल्स मिसळून ते भेगाना लावून बघा. फायदा होतो.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.