झोप येत नाही? कृपया झोपेची गोळी घेऊ नका, करा हा उपाय…

मित्रानो आज आपण पाहणार आहोत ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. अनिद्रा , इंसोमनिया हा त्रास ज्यांना आहे. रात्री झोप लागते मात्र मध्येच अचानक झोप मोड होते. तसेच एकदा झोप मोड झाली की पुन्हा झोप लागत नाही. मित्रानो ही सगळी लक्षणे अनिद्रा ची आहेत, आपल्याला इंसोमनिया नावाचा रोग झाला आहे. मित्रानो ह्या आजारावरती काही आयुर्वेदिक औषधे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीचे उपाय आहेत. आपल्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही.

मित्रानो अनेक जणांना ताबडतोप झोप लागते अतिशय सुखी माणस असतात हे अंग टाकल्या टाकल्या झोप लागते. मात्र काही जणांना खूप प्रयत्न करुण ही झोप लागत नाही. नेमकं अस का होत, याच्या मागे कोणती कारणे आहेत आणि याचे कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात यावर कोणत्या उपाय योजना करायला पाहिजे. सर्व आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ही माझी माहिती तुमच्या खूप कामाची असणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, शेवटपर्यंत वाचा. मी तुम्हाला इथे पूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग सुरू करूया.

आपण सर्व प्रथम सुरवात करूया की नेमकं अस झाल्याने कोणते गंभीर परिणाम होतात. मित्रानो याचा पहिला परिणाम आहे ‘ स्ट्रेस ‘ ज्या माणसाची झोप पूर्ण होत नाही मध्ये मध्ये झोप मोड होते, तो माणूस चिडचिड करतो त्याचा स्वभाव चिडचिडा होतो, स्ट्रेसफुल्ल तो माणूस बनतो आणि याचे रूपांतर नंतर “डिप्रेशन” मध्ये होते तो माणूस डिप्रेशन मध्ये जातो,आणि एकदा का माणूस डिप्रेशन मध्ये गेला की त्याला त्यामधून बाहेर काढणे खुप कठीण जाते. असे हे गंभीर परिणाम अनिद्रेचे होवू शकतात, या मागे कोणती कारणे असतात एक म्हणजे सतत काळजी करणे.

मित्रानो प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या असतात, प्रॉब्लेमस असतात पण याचा अर्थ सतत काळजी करणे, सतत चिंता करणे नाही आहे. जे लोक सतत चिंता करतात, सतत ताणतणावाखाली असतात त्यांना ‘अनिद्रा’ हा प्रॉब्लेम नक्की होतो. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री जर आपण उशीरा झोपत असाल व झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक साधने म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही जर आपण पाहत असाल तर यामुळे ही तुम्हाला ‘अनिद्रा ‘ हा आजार होवू शकतो.

पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवल्या नंतर लगेच झोपत असाल तर यामुळे ही तुम्हाला ‘अनिद्रा’ हा आजार होवू शकतो. जे लोक खूप जेवतात पोटापेक्षा ज्यास्त जेवतात अश्या लोकांना ही झोप लागत नाही, कारण आपण जे खाले असते त्याचे पचन होणे गरजेचे असते जर पचन चांगले झाले नाही तर ‘अनिद्रा’ हा आजार होवू शकतो. मित्रानो तुम्ही झोपेच्या गोळ्या जर घेत असाल तर त्या पहिल्या बंद करा. त्याचे कारण असे की तुम्हाला ह्या गोळ्यानी आत्ता झोप येत असेल, पण कालांतराने तुम्हाला अजिबात झोप लागणार नाही.

या गोळ्याची तुमच्या शरीराला तुमच्या मेंदूला सवय लागेल. या गोळ्यांशिवाय तुमचे जीवन चालणार नाही व ह्या गोळ्या चांगल्या ही नाहीत याचा परिणाम आपल्या मेंदूवर व किडनी वर होत असतो. मग आपण कोणते उपाय करायला हवेत मित्रानो सगळ्यात साधा आणि सोपा उपाय ‘केळी’ हा आहे. रोज झोपण्यापूर्वी एक तास आधी एक, दोन केळी चे सेवन करा याचे कारण असे की केळी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण मोठ्या प्रमाणत असते.

आपल्या मेंदूला जर शांत ठेवायचे असेल तर मॅग्नेशियम गरजेचं असते .अशी केळी जर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ते दोन खात असाल तर तुम्हला शांत झोप लागेल. दुसरा उपाय आहे ‘बडीशेप’ तुम्ही बडीशेप दहा ग्रॅम घ्या त्याच्या मध्ये साधारणता पन्नास ग्रॅम पाणी घ्या म्हणजे समजा तुम्ही एक चमचा बडीशेप घेतली तर साधारणता पाच चमचे पाणी घ्यायचे आहे. मिश्रण गरम करायचे आहे साधारणता निम्मे पाणी हो पर्यंत मिश्रण गरम करायचे आहे. नंतर त्याचे सेवन जर तुम्ही झोपताना एक ते दोन चमचे केले तर या मुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.

तिसरी गोष्ट म्हणजे ‘ त्रिफळा ‘ साधारण पाच ते दहा ग्रॅम त्रिफळा घायचा आहे आणि त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घायचा आहे. व मिक्स करून ते पियायचे आहे. यामुळे तुमची पचन क्रिया सुधारेल परिणामी मेंदूला त्रास हिणार नाही. चौथा उपाय आहे ‘ भांग ‘ मित्रांनो तुम्हाला भांग माहीत असेलच तर पन्नास ग्रॅम भांग घ्यायची आहे. त्यामध्ये तीनशे ग्रॅम खाडीसाखर व दीडशे ते दोनशे ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत व हे सगळे मिश्रण मिक्सर मध्ये मिक्स करुन त्याची पावडर करून घ्यायचे आहे.

हे रोज झोपताना एक ग्लास दुधामध्ये साधारण ता पंधरा ते वीस ग्रॅम ही पावडर घ्यायची आहे आणि पियायचे आहे. पाचवा उपाय म्हणजे गाजर मित्रानो रात्री झोपताना एक ग्लास गाजराचा ज्युस करून पिला तरी तुम्हाला शांत झोप लागेल, गाजराचे वैशिष्ट्य म्हणजे गाजरा मध्ये मेंदूला रिलॅक्स करण्याचं अल्फा-कैरोटीन नावाचा घटक असतो. मित्रानो हे होते अनिद्रा वरील उपाय या मधील कोणताही एक उपाय वापरा एक पेक्षा ज्यास्त वापरले तरी चालेल या मुळे अनिद्रे वरती शंभर टक्के आराम मिळेल.

आता हे उपाय करताना आपण थोडी फार काळजी घेणे गरजेचं आहे. ते म्हणजे जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर दुपारी झोपणे सोडून द्या, रात्री जेवल्या जेवल्या लागेच झोपायचं नाही किमान दोन तासांनी जेवल्यावर झोपायचं आहे, चहा, कॉफी टाळा, अतिचिंता सोडून द्या, सकाळी प्राणायम, योगासन करा ही काळजी आपल्याला घ्यायची आहे एकदा हे करून बघा ‘अनिद्रा ‘ वर शंभर टक्के आराम मिळेल. माहिती आवडली असेल, तर लाइक आणि शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *