चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ही वस्तु घेण्यामध्ये व जबरदस्तीने मागण्यामध्ये कधीही लाज बाळगू नका. जर तुम्ही या गोष्टी मागण्यामध्ये लाज बाळगली तर तुमचे यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. ह्या वस्तु न घेतल्यामुळे तुमची अवस्था बिकट होऊ शकते. मित्रांनो, ही गोष्ट एकदम सत्य आहे, की जुन्या काळातील मान्यतेनुसार जी व्यक्ति या वस्तु मागताना लाज बाळगतो तर त्याला कधीही यश मिळत नाही व समाधान मिळत नाही. आचार्य चाण्यक्यांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.
आचार्य चाण्यक्यांनी मानवी जीवनासाठी आपल्या चाणक्यनितीमध्ये बर्याच अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कोणी व्यक्तीने अनुसरल्या, तर त्याला त्याच्या जिवनात सफल होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या घेतल्यामुळे, किंवा हक्काने मागायला लाज बाळगता कामा नये., खास करून एखाद्या पुरुषाला. चला जाणून घेऊया. तुम्ही त्याआधी माझ्या माहितीला लाइक करायला विसरू नका.
१. पती-पत्नी मधील प्रेम- मित्रांनो, शारीरिक संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रेमी जोडीने ह्या चुका कधीही करू नयेत. प्रेमसंबंधाना मजबूत बनविण्यासाठी दोघांनी एकमेकांची मते, विचार जाणून घेणे खूप जरूरी आहे. ज्या प्रेमी जोड्या एकमेकांशी बोलताना शरम बाळगतात व संबंधाच्या वेळी घाबरून जातात, त्यांच्यामध्ये कोणी गैरपुरुष किंवा गैरमहिला आपले स्थान निर्माण करू शकतात. म्हणून, संबंधांच्या वेळी लाज बाळगू नका. एकमेकांवर प्रेम करा.
२. भोजन करताना लाज- भोजन करताना लाज बाळगू नये. मित्रांनो, चाणक्यांच्या मतानुसार कोणत्याही व्यक्तीने भोजन करताना लाज बाळगू नये. ज्या लोकांना भोजन करताना लाज किंवा शरम वाटते, ते उपाशीच झोपतात. ही लाज त्यांना संकटात टाकू शकते. भुकेलेला व्यक्ति क्रोधाचा शिकार होतो, म्हणून त्याने पोटभर जेवले पाहिजे, लाज बाळगू नये.
३. गुरुकडून किंवा कोणाकडून ज्ञान घेणे- गुरुकडून किंवा इतर कोणाकडून ज्ञान प्राप्त करताना शरम करू नये. आचार्य चाणक्यांच्या मते, आपल्या गुरुकडून ज्ञान घेताना कधीही लाज बाळगू नये. कारण जो व्यक्ति ज्ञान संपादन करताना लाज बाळगतो, त्याचे ज्ञान अर्धवट राहाते, अपूर्ण राहते. अशी व्यक्ति आपल्या जीवनात कधीही सफल होत नाही.
४. उधार पैसे- मित्रांनो, आचार्य चाणाक्यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने दुसर्या व्यक्तिला उधार दिलेले पैसे परत मागितले पाहिजेत. जी व्यक्ति आपलेच पैसे मागायला शरम करते, तो कधीही धनवान होऊ शकत नाही. म्हणून उधार दिलेले पैसे मागायला कधीही लाज बाळगू नये. ही चूक कधीही करू नका. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर लाइक जरूर करा.