फक्त 1 रुपयात छातीतील कफ, सर्दी खोकला दातदुखी बंद…

मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये बऱ्याच व्यक्तींना सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी झाल्यासारखे होणे यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये कफ जमा असतो. हा कफ जमा झाल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला, ओला खोकला असतो. अशा सर्व समस्येवरती आपण घरातील एक शक्तिशाली आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.

या उपायाने कसल्याही प्रकारचा छातीत जमा असलेला कफ यासोबतच सर्दी, डोकेदुखीचा त्रास पूर्णतः कमी होतो. अशा या उपायासाठी आपल्याला जे दोन पदार्थ लागणार आहेत. या पदार्थांतील लागणार आहे वेखंड. सहज आयुर्वेदिक स्टोअरवरती पाहायला मिळते. यासोबतच आपल्याला लागणार आहे ओवा. सर्वांच्या परिचयाचा आणि सहज मिळणारा ओवा.

या दोन पदार्थांमध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जमा असणारा कफ, सर्दी कमी करण्यासाठी खूप लाभ देतात. मित्रांनो सुरुवातीला जे साहित्य उपलब्ध होईल त्या मदतीने चिमूटभर ओवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. हे दोनही पदार्थ वेखंड आणि ओवा एकदम बारीक याचे चूर्ण करायचे आहे. ओवा बारीक केल्याच्या नंतर यामध्ये वेखंड टाका आणि याचीही बारीक पावडर करून घ्या.

हे दोन्ही पदार्थ बारीक केल्यानंतर आपल्या घरातील सुती कपडा किंवा कॉटनचा कपडा किंवा हात रुमाल जे साहित्य मिळेल त्यावरती टाका. टाकल्याच्या नंतर याची पोटली बनवा. ज्या ही व्यक्तींना सर्दी झाली आहे अशा व्यक्तींच्या नाकाजवळ त्यांना श्वास घ्यायला लावा. लहान मुले असो, मोठे व्यक्ती असो. लहान मुलांना जास्त वेळ याचा श्वास घ्यायला देऊ नका.

ही जी पोटली नाकाजवळ ठेवल्याने नाक लगेच मोकळे होते. बऱ्याच व्यक्ती इनहीलरचा वापर करतात. इनहिलर पेक्षा खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून पाहा. सर्दी ह्याने लगेच कमी होते. डोकं दुखणे यासोबतच कफ मोकळा होणारा हा उपाय आहे. तसेच बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये कफ जमा असतो हा जमा झालेला कफ मोकळा करण्यासाठी फक्त चिमूटभर ओवा घ्या आणि यामध्ये घरात सहज उपलब्ध होणारे नमक म्हणजे मीठ चिमूटभर घ्या. हे एकत्र करा आणि हे तोंडामध्ये ठेवा.

तोंडात चावून चावून याचा रस गिळत राहा. मित्रांनो याने छातीमध्ये असणारा कफ मोकळा होतो आणि कफ मोकळा होऊन कफ कमी होतो. तसेच ओवा तोंडात ठेवल्याने दातदुखीचा त्रास, हिरड्या दुखणे यासोबतच बऱ्याच व्यक्तींचे दात ठणकने हे ही लगेच कमी होते. दात दुखताच तुम्ही ओवा तोंडात ठेवा लगेच दात दुखणे बंद होते.

यासोबतच वारंवार बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला होतो असा हा कोरडा खोकला कमी होण्यासाठी सर्वात सोपा उपाय नागिणीचे विड्याचे पान घ्या आणि त्या विड्याच्या पानामध्ये तुम्ही चिमूटभर ओवा टाका, याने कोरडा खोकला लगेच कमी होतो. परंतु हे पान खाण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी किंवा थोडंस गरम पाणी पिल्याने खूप फायदा होतो. अशा या उपायाने कसलाही प्रकारचा सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखीचा त्रास कमी होतो. तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. धन्यवाद..

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.