रतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याच देशातील एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही माहिती आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामासाठी जाण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात त्याच्या समोर घर मालक येऊन उभा राहिला. आज कस येणे झालं उद्योगपतीने त्या माणसाला विचारलं. कामाच्या नादात तो विसरून गेला होता की समोर त्याचा घर मालक उभा आहे.

घर मालक विनम्रपणे म्हणाला मी भाडे वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता, यावेळी कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतंय. उद्योगपती म्हणाला हे घ्या तुमचं घर भाडे. उशीर झाल्याबद्धल क्षमा करा. एवढे बोलून उद्योगपतीने खिशात हात घालून पैसे काढले व घर मालकाला दिले.

घर मालक उद्योगपतीला म्हणाला तुम्ही एवढे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता याचे मला आश्चर्य वाटते. उद्योगपती हसला व म्हणाला मी कोण आहे या पेक्षा मी कसा आहे याला महत्व आहे. माझ्या काही तत्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो. घर मालकाला काही समजले नाही तो भाडे घेऊन निघून गेला. हा प्रसंग त्या उद्योगपतीचा ड्रायवर पाहत होता.

उद्योगपती गाडीत बसले आणि विमानाचं तिकीट काढण्यासाठी एअरपोर्ट वर गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपतीं एका सामान्य माणसासारखे रांगेत उभे होते. तेवढ्यात एअरलाईन चे काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. ते कर्मचारी घाईने पुढे आले आणि म्हणाले, सर तुम्ही रांगेत का उभे आहे? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोप्यावर आरामात बसा.

तुम्ही एवढे मोठे उद्योगपती रांगेत उभे राहून आम्हाला लाजऊ नका. उद्योगपती म्हणाले आता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही. तुम्ही एवढी धावपळ करण्याची खरच आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेलं विशेषण आहे. मी कोण आहे या पेक्षा मी कसा आहे हे अधिक महत्वाचं आहे. हे उत्तर ऐकून कर्मचारी आचार्य चकित झाले.

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिस कडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावत पळत आपल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करत आहे. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट देण्यास सुरुवात केले. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

ज्या दिवशी उद्योगपती परदेशी प्रवासासाठी निघाले त्या दिवशी आणखीन एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून ज्युसचा ग्लास सांडला. त्यामुळे ती घाबरली तिने पाणी व कापडा आणून ड्रेस स्वच्छ केला. ते त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची माफी मागितली. तिला भीती वाटत होती की या चूकी बद्धल तिला शिक्षा घडणार..

उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले तू माझ्या अंगावर काय सांडलेस! हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला. मला माफ करा. उद्योगपती हसले व म्हणाले पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा आणि whisky सांड. उद्योगपती चे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुद्दकण हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला. असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायवर ने पाहिले व ऐकले.

तो उद्योगपतीना म्हणाला साहेब तुम्हाला इतके साधे राहणे, वागणे कसे काय जमते. आम्ही तर अर्ध्या हळकुंठाणे पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगाता. उद्योगपती म्हणाले अरे मी पण लहान असतांना फार उधाम होतो. मला सांभाळायला एक नर्स होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे चिडले होते की त्यांनी मला खूप मारले.

ते मला म्हणाले होते तू कोण आहेस हे बिलकुल महत्वाचे नाही पण तू कसा आहेस हे फार महत्वाचे आहे. आयुष्यभर हे वाक्य लक्षात ठेव. तेव्हा पासून मी वडिलांचे वाक्य लक्षात ठेवत आलो आहे. मला हे पटले आहे की खरोखरच आपण कोण आहोत हे महत्वाचे नसते, आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले ते सगळे साधे होते. या उद्योगपतीचे नाव रतन टाटा होते.

मित्रांनो लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *