एक उपाय शेतातील व घरातील #उंदीर कायमचा पळून लावा !

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात. तसे तर उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन मानले गेले आहे पण जेव्हा ते माणसाला त्रास देतात तेव्हा त्यांना घराबाहेर काढणेच योग्य असते. मुक्या प्राण्याचा जीव न घेता या उंदरांना आपण घराबाहेर काढू शकतो. 

तुमच्या घरामध्ये वारंवार उंदीर येत असेल, उंदीर खूप सारा उपद्रव करत असेल, धान्य कपडे यांचे नुकसान करत असेल. आपल्या शेतामध्ये आलेले धान्य आपण जे साठवून ठेवतो. जे वर्षभर पुरेल इतके आपण साठवून ठेवतो. या धान्याला जर जास्त उंदीर लागले असतील किंवा या धान्याचे नुकसान करत असतील तर अशा या उंदरांना त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपाय महत्वाचा ठरणार आहे.

अशा या उपायासाठी या आपल्याला साधारणतः एक तुरटीचा तुकडा लागणार आहे. अशा या तुरटीच्या मदतीने आपण हा उपाय करणार आहोत. या तुरटीचे आपल्या घरातील जे साहित्य उपलब्ध असेल त्याने याचे एकदम बारीक चूर्ण करायचे आहे. हे जे तयार होणारे बारीक चूर्ण आहे हे आपल्याला वापरायचे आहे. या चूर्णाच्या मदतीने आपला उपाय करायचा आहे.

ज्या ठिकाणी उंदीर वारंवार येतात किंवा आपल्या आपल्याला उंदीर पाहायला मिळतो किंवा उंदराचे ज्या ठिकाणी बीळ आहे किंवा घुस ज्या ठिकाणी येते, त्याचे जे बीळ आहे, नुकतंच आपल्याला समजते की उंदराने पोखरलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला सोपा उपाय करायचा.

या उपायासाठी हे जे चूर्ण आहे हे वापरायचे आहे. तर करायचं काय आहे? तर हे जे चूर्ण आहे हे आपल्याला त्या बिळामध्ये टाकायचे आहे किंवा उंदीर ज्या ठिकाणी सतत येतो किंवा ज्या ठिकाणी धान्य आहे त्या ठिकाणी ही तुरटी टाका.

या तुरटीचा सतत जर वास घेतला तर नाकात आणि घशात सूज येते असे माणसांच्या बाबतीत घडते त्याचप्रमाणे या उंदरांना देखील हाच नियम लागू पडतो. ज्या ठिकाणी तुरटीचे चूर्ण किंवा खडा ठेवलेला आहे त्या ठिकाणी उंदीर आपल्याला परत पाहायला मिळत नाही.

उंदरांच्या त्रासा पासून सुटका मिळवण्यासाठी पिपरमिंट एक चांगला उपाय आहे. पिपरमिंटचा वास उंदरांना बिलकुल आवडत नाही. कापसाचे तुकडे घेऊन ते पिपरमिंट मध्ये बुडवा. आता हे तुकडे उंदीर जेथे दिसतात किंवा जेथे येण्याची शक्यता असते तेथे ठेवा. या वासामुळे उंदराचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे ते घराबाहेर जातात किंवा श्वास गुमदरल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. पण या व्यतिरिक्त असे अनेक उपाय आहेत ज्यातून उंदरांना इजा न देता आपण बाहेर घालवू शकतो. 

पुदीना उंदरांच्या मध्ये भीती निर्माण करते. पुदीन्याची पाने किंवा फुले उंदीरांच्या बिळामध्ये टाकावी किंवा जर घरात उंदीर असतील तर घरात जेथे जेथे उंदरांचा वावर असतो तेथे पुदीना टाकावा याच्या वासामुळे उंदीर घराबाहेर पळून जातील. पुदिन्या प्रमाणेच तेज पत्ता पण उंदीर घराबाहेर काढण्यास मदत करते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. तुम्ही हा उपाय करून पाहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद.. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.