झोपताना 10 मिनिट लावा खरूज, नायटा, गचकर्ण, जांगेतील खाज कायमची संपवा…

नमस्कार मित्रांनो, आजकाल बऱ्याच व्यक्‍तींना खरूज नायटा गजकर्ण झालेले जास्त पाहायला मिळत आहे. म्हणून त्वचेचे आजार संपवणारा हा उपाय आज तुमच्यासाठी. खाज असो किंवा आग असो, जागेवरच थांबवणारा हा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरुज किंवा गजकर्ण यांचा सुरुवातीचा काळ असेल तर आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध होणारा लसूण वापरायचा आहे.

लसणामध्ये असणारे गुणधर्म इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. लसनामध्ये असणारे तेल थोडासे दाबून इन्फेक्शन वर लावा. जर प्रारंभिक अवस्था असेल तर हा उपाय नक्की करा. जर गुप्त अंगामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर लसुन बारीक कुस्करून त्या ठिकाणी लावा.

दुसऱ्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध होणारा असा “ओवा”. आणि या ओव्या मध्ये पाणी घालून ते मिक्सरमधून वाटून घ्या. व तो लेप इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावा. हा दुसरा उपाय जास्त इन्फेक्शन झालेल्या किंवा खरुज झालेल्या लोकांसाठी आहे. ज्या व्यक्तींना खूप भयंकर प्रमाणामध्ये नायटा खरूज किंवा गजकर्ण आहे त्यांनी पुढील उपाय नक्की करा.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे “कडुलिंब”. ज्यांना वारंवार खरूज नायटा व त्वचेचे रोग होतात अशा लोकांनी रक्तातील दोष कमी करण्यासाठी हा उपाय करा. रक्तातील दोष कमी झाल्याने त्वचेवरील रोग निघून जातात. अशा व्यक्तींनी दररोज कडूलिंबाच्या झाडाखाली बसावे व नियमित एक कडूलिंबाचे पान नक्की खावे. तसेच कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करा.

खूप दिवसापासून असणारा नायटा व खरुज घालवायचा असेल तर कडुलिंबाची पाने व मेहंदीची पाने सम प्रमाणात घ्या. ही पाने थोडेसे पाणी टाकून वाटून घ्या. संध्याकाळी झोपताना थोडेसे पाणी उकळवून घ्या त्यामध्ये मेहंदीची पाने टाका. आणि जसे सहन होईल तसे ते पाणी इन्फेक्शन च्या ठिकाणी लावा. असे केल्याने त्या ठिकाणचे जंतू मरून जातील. नंतर हे कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या.

यानंतर मेहंदी व कडुलिंबाचा जो कुटून घेतलेला पाला आहे तो इन्फेक्शनच्या ठिकाणी लावा. रात्रभर हा पाला कपड्याने बांधून झोपा. असे केल्याने त्या जागेची आग शांत होईल व दोन दिवसातच खरूज नायटा कमी होईल. अशाच प्रकारे कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने रक्तातील दोष कमी होतो व त्वचेचे रोग निघून जातात. हा उपाय आवडला असेल तर नक्की करा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *