नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की दोन मिनिटात आपण आपले पोट कसे साफ करू शकतो. जर तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाचा मेला साफ होत नाही, पोटाच्या समस्या आहेत या सर्व समस्या घालवण्यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो उपाय पाहण्यापूर्वी आपण पाहुयात की आपलं पोट का साफ होत नाही. आहार, विहार आणि आपण मन या तीन गोष्टी याला कारणीभूत आहेत. आपण जर तेलकट, तुपकट पदार्थ जास्त खात असेल, जर आपल्या खाण्यामध्ये बेकारी पदार्थांचे प्रमाण जास्त असेल, फास्ट फूड च प्रमाण जास्त असेल तर आपल्याला पोटाचे विकार होणारच. आपलं पोट साफ होऊ शकत नाही.
दुसरी गोष्टी विहार. आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी त्यासाठी आपण सकाळी पळायला जाण किंव्हा हलके व्यायाम प्रकार, योगासने करायला हवीत. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी तरी तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे आपलं मन. मित्रांनो ज्या लोकांच्या जीवनात ताणतणाव आहेत त्या लोकांनी कितीतरी व्यायाम केला, कितीही चांगल्या प्रकारचा आहार घेतला तरी देखील या ताणतणाव मुळे त्यांना हे पोटाचे विकार होत आहेत. गॅसेस होत आहेत, अपचन, पित्त यामुळे पोट साफ होत नाही. मित्रांनो हा तीन गोष्टी लक्षात ठेवा.
पोट साफ करण्याचा उपाय- मित्रांनो आम्ही तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहे. पहिला जो उपाय आहे तो म्हणजे सिताफळीचे झाड. होय मित्रांनो या सिताफळीच्या झाडाचे एक पान आपल्याला सकाळी खायचे आहे. हे पान तुम्ही चाऊन चाऊन खा.
मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे एरंडेल तेल. मित्रांनो कोरा चहा तुम्ही बनवा आणि या कोऱ्या चहा मध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल टाकायचे आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही प्या. हा जो उपाय आहे तो आठवड्यातून एकदा करायचा आहे.
तिसरा उपाय म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता ब्रश देखील न करता दोन ग्लासभर कोमट पाणी प्यायचे आहे. हे पाणी पिल्याने आपलं पोट नक्की साफ होईल. तर मित्रांनो असे हे तीन उपाय तुम्ही नक्की करा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.