जर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. ह्या संपूर्ण विश्वामध्ये सर्वशक्तिमान ईश्वरच आहे. त्यांच्या इछेशिवाय एक पानसुद्धहा इकडचे तिकडे होत नाही. ही गोष्ट वेळोवेळी सिद्ध झाली आहे. ईश्वर प्रत्यक्षपणे भले आपल्याला दिसत नाही, पण अप्रत्यक्षरूपाने ईश्वर कणाकणात वसलेला आहे. ही गोष्ट पण सत्य आहे, की आपल्यापैकी काही लोक भाग्यशाली असतात, कारण त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा असते आणि काही अशा काही शक्ति त्यांच्या आसपास विद्यमान असतात, ज्या त्यांना योग्य मार्ग दाखवितात व संकट सहाय्य करतात.

या ईश्वरी शक्ति काही अशा लोकांना निवडतात, जे स्वत: योग्य मार्गावर चालून दुसर्‍या लोकांना पण योग्य मार्गदर्शन करतात. पण आपल्याला कसे समजेल, की कोणत्या व्यक्तींमध्ये अशी अलौकिक शक्ति आहे, किंवा ईश्वराची कृपा कोणत्या व्यक्तीवर आहे. तर तुम्हाला सांगतो, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये काही अशा संकेतांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे आपण हे समजू शकतो, की त्या व्यक्तीवर ईश्वराची कृपा आहे व अलौकिक शक्ति नेहमी त्याच्याबरोबर आहे.

चला तर मग जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, लाइक आणि शेअर करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक माहिती मिळू शकेल. पहिली गोष्ट – ज्या व्यक्तिमध्ये काम, क्रोध, मोह, माया, ईर्षा, लोभ, अहंकार, अशा प्रकारच्या भावना नसतील, असा व्यक्ति ईश्वराची विशेष कृपा प्राप्त करतो. असा व्यक्ति व्यभिचार करीत नाही, क्रोध करत नाही, त्याला आपल्या क्रोधावर काबू ठेवणे जमते, असा व्यक्ति आपल्या आचरणाने व व्यवहाराने दया व प्रेमाच्या भावनेने दुसर्‍याशी वागतो, अशी व्यक्ति संतोषी वृतीची असते. त्याला कोणताही लोभ नसतो, आहे त्या गोष्टीत तो संतुष्ट राहातो.

दुसरी गोष्ट- जर कोणत्या व्यक्तिला स्वप्नात मंदिर किंवा त्याच्या आसपासचा परिसर दिसतो, तर शास्त्रामध्ये अशा व्यक्तिला भाग्यशाली मानले गेले आहे. ज्यांना आपल्या स्वप्नामध्ये ईश्वराचा साक्षात्कार होतो, त्यांना ईश्वर काही विशिष्ट संकेत देतात. ज्यामुळे तो व्यक्ति समजू शकतो की अलौकिक शक्ति प्रत्येक वेळी त्याच्या बरोबर आहेत.

तिसरी गोष्ट- जो व्यक्ति आपल्या दैनिक कार्यामधून उरलेला वेळ ईश्वराच्या भक्तीत, आराधनेत व नांस्मरणात घालवतो, वास्तवात त्या व्यक्तीच्या आसपास ईश्वराचा निवास असतो. ज्यामुळे त्याला ईश्वराचा आभास होत राहातो. चौथी गोष्ट- जो व्यक्ति समाजाप्रती आपले दायित्व समजतो, चांगले काम करतो, संकटात सापडलेल्या व्यक्तींना आपल्या परीने मदत करतो, संकटात सापडलेल्या मनुस्य किंवा पशू पक्षांची मदत करतो, अपंग लोकांची सेवा करतो, धार्मिक कार्य करतो अशा व्यक्तीवर ईश्वराची विशेष कृपा असते, असा व्यक्ति शेवटी मोक्षाला प्राप्त करतो.

पाचवी गोष्ट- ईश्वरकृपा असलेल्या व्यक्तींमध्ये एक अनोखी शक्ति असते, ती म्हणजे पूर्वाभास., म्हणजेच भविष्यात होणार्‍या काही विशेष घटनांचे आधीच आभास होणे. जर तुम्हाला भविष्यात घडणार्‍या घटनांचे आभास होत असतील, तर तुमच्यावर ईश्वराची विशेष कृपा आहे.

सहावी गोष्ट- काही लोकांना स्वत:च्या आसपास विशिष्ट सुगंधाचा अनुभव येतो. नेहमी सुगंधित फूल, धूप, अगरबत्ती, किंवा कापुरासारख्या पवित्र वस्तूचा सुगंध हवेत जाणवत असेल, तर त्यांच्याजवळ ईश्वराचा वास आहे याचा हा संकेत आहे.

सातवी गोष्ट- ईश्वराची वेळ म्हणजेच ब्रम्हमुहूर्त सकाळी ३.३० वाजल्यापासून ५.३० वाजेपर्यंत असतो. आपल्या शास्त्रामध्ये वेळेला खूपच महत्व आहे. या वेळेला वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची झोप या वेळेस पूर्ण होत असेल, व अत्यंत प्रसन्न चित्ताने आपली नित्यकर्मे करतो, आराधना करतो, तर असा व्यक्ति ईश्वराच्या इछेने हे सर्व करतो.

आठवी गोष्ट- काही वेळेस आपण मंदिरात कीर्तन, भजन ऐकायला जातो, किती सुंदर भजन असेल, तरी आपले लक्ष लागत नाही, आपण वेगळाच विचार करतो, पण काही लोक भजनात तल्लीन होऊन जातात, त्या व्यक्तींवर ईश्वराची कृपा राहाते.

नववी गोष्ट- जी व्यक्ति ईश्वरचरणी परमानंदाची अनुभूति करतो, ईश्वर भक्तीला वास्तविक आनंद मानतो, अशी व्यक्ति कधीही दू:खि राहत नाही किंवा कोणाला दू:ख देत नाही. त्याचे मन शांत राहते. हा त्याला ईश्वराकडून मिळालेला आशिर्वाद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *