घराजवळील ही वस्तू वापरा, फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. निरोगी व आरोग्य जीवन जगण्यासाठी पोषक असतो योग्य आहार. या आहारासाठी जे धान्य, कडधान्य आपण वापरत असतो हे जर खराब असले तर याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. किंव्हा तुम्ही शेतकरी असाल तर धान्य खराब राहिल्यास विक्री करतांना खूप कमी किमतीने व्यापारी हे धान्य विकत घेतात. म्हणजे आपला फायदा न होता नुकसान होते.

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला हे माहीतच हवे कि धान्या मध्ये किडे, अळ्या का होतात. धान्यामध्ये किडे, अळ्या होऊ नयेत म्हणून काय करावे. हे आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो धान्य आपल्याला वर्षभर पुरावे म्हणून आपण धान्य साठवून ठेवत असतो. परंतु याच धान्यामध्ये साधारणता १२ प्रकारचे किडे तयार होतात. यामध्ये सोंड, भुंगेरा, खापरा किडा, असे किडे होत असतात.

हे किडे जास्तकरून पावसाळ्यात पाहायला मिळतात. पावसाळ्यात असणारे तापमान व आद्रता किड्यांना पोषक ठरते. म्हणून पावसाळ्यात जास्त धान्याला जपावे लागते. कीटकांचा जीवनक्रम १ ते १५ दिवस असून त्यांची प्रजनन प्रक्रिया जास्त असल्याने त्यांची संख्या खूप झपाट्याने वाढते.

कृषीतज्ञांच्या मतानुसार धान्याला कीड का लागते तर या किड्यांचा प्रादुर्भाव शेतात धान्य पिकत असतानाच होतो. पिकलेल्या धान्यावर ते अंडी घालतात. अशा प्रकारे किड्यांचा प्रादुर्भाव साठवलेल्या धान्यामध्ये होतो. साठवणुकीची साधने पोते यांमध्ये किडे आसरा शोधतात. म्हणूनच कबरदारीचे उपाय करणे खूप आवश्यक असते.

मित्रांनो या साठी आपण धान्य ऊन्हात चांगल्याप्रकारे वाळवावे. धान्य भरणारी साधने नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावीत. धान्य साठवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. धान्य ठेवतांना जमिनीवर बांबू, फळ्या ठेवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा धान्यांना लागणार नाही.

अशा प्रकारे धान्याची काळजी घेतल्यानंतर याच धान्यामध्ये आपल्याला, आपले धान्य किड मुक्त राहण्यासाठी आपल्याला त्या मध्ये दोन वनस्पतींचा वापर करायचा आहे. मित्रांनो पहिली वनस्पती आपल्याला या मध्ये वापरायची आहे गुळवेल. धान्यामध्ये वर्षभर किडे, मुंग्या न होण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशीर ठरतो. म्हणून गुळवेल चा वापर करतांना गुळवेलचे बारीक बारीक तुकडे करा.

या गुळवेल सोबत दुसरी जी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे कडूलिंब. ह्या दोन्ही वनस्पती टाकताना धान्याच्या खाली १ ते २ थर लावा आणि वरती १ थर लावा. असे केल्याने किड होणार नाही. या सर्व समस्या कमी होतील. किडे झाले असतील तर ती निघून जातील. शेतकरी मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.