आपल्या घरातील टॉयलेट मध्ये गुपचूप टाका फक्त मूठभर मीठ 30 सेकंदात पहा चमत्कार…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो मानवी जीवनात मिठाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून मिठाचा वापर करून अनेक प्रकारचे टोटके आणि उपाय केले जात आहेत. मानवी जीवन सुखी बनावं कुणी काय केलेलं आहे, टोटका केला आहे, काही बाधा आहे घरामध्ये किंवा तुमच्या वास्तूत काही अदृश्य शक्तींचा वास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि कदाचीत त्यामुळे तुमच्या जीवनात जर अनेक प्रकारच्या समस्या असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, घरात सतत वादविवाद होत असतील तर अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेले मिठाचे काही उपाय, काही टोटके करू शकता.

मित्रांनो भारतामध्ये अशी प्राचीन मान्यता आहे की मीठ नकारात्मक गोष्टींना स्वतः मध्ये अवशोषित करते, शोषून घेतं. आपल्या आसपास जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल, कुणी काही बाधा केली आहे किंवा काही अदृश्य शक्ती आहे ती तुम्हाला त्रास देत आहेत तर या अदृश्य शक्तींना वाईट शक्तींना शोषून घेण्याची शक्ती या मिठात असते. म्हणूनच पहिली महत्वाची गोष्ट महिलांनी किचनमधील मीठ हे नेहमी झाकून ठेवावे. उघड्यावर असणारे मीठ मोठ्या प्रमाणावर दूषित बनण्याची शक्यता असते.

मीठ ठेवताना प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर चुकूनही करू नका. नेहमी काचेच्या पात्रात, काचेच्या बरणीमध्ये हे मीठ व्यवस्थित झाकून ठेवावे. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवलेलं मीठ मानवी आरोग्यासाठी हानीकारक मानले जाते. मोठं मीठ असते ते मोठं मीठ पाण्यात टाकून त्याने दररोज फरशी पुसत चला गुरुवारचा दिवस वगळून. अशाप्रकारे मोठं मीठ टाकलेलं पाणी आणि आपण या पाण्यानं जेव्हा फरशी पुसतो तेव्हा मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा, घरात असणारे वास्तू दोष मोठ्या प्रमाणात कमी होतात. घरामध्ये सुखसमृद्धी नांदू लागते. अत्यंत छोटा मात्र प्रभावी उपाय आहे.

मात्र गुरुवारच्या दिवशी आपण मीठ तर टाकायचं नाहीच तसेच पोछा सुद्धा मारायचा नाही. अनेकदा आपल्या जवळच्या वातावरणात अनेक प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात आणि त्यामुळे घरात टेन्शन वाढतात, नकारात्मक भावनेने लोक ग्रसित होतात. अशावेळी नक्की काय होत हे कळत नाही. घरातील लोक भांडू लागतात. पती पत्नी मध्ये वाद होतात. एक छोटीशी गोष्ट नक्की करा घरावरती खूप संकटे येऊ लागली आहेत अशावेळी एका काचेच्या वाटीमध्ये आपण मूठभर मीठ ठेवा आणि काचेची ही वाटी आपल्या बाथरूम मध्ये आणि सोबतच आपल्या टॉयलेटमध्ये ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल ती एकाच जागेवर ठेवा त्यांनतर ती वाटीची जागा हलवू नका. ती जागा पक्की करा.

मित्रांनो हे वाटीत ठेवलेलं मीठ त्या घरातील निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात शोषून घेते. लक्षात घ्या ज्याप्रकारे आपल्या घरातले देवघर सकारात्मक ऊर्जेच केंद्र आहे अगदी त्याच प्रकारे टॉयलेट असेल, बाथरूम असेल किंवा अंधारलेली जागा असेल या आपल्या घरातील जागा नेगटीव्ह एनर्जीच्या सर्वात मोठ्या स्रोत आहेत. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नेगटीव्ह एनर्जी बाहेर पडत असते. जेव्हा जेव्हा काम होईल तेव्हा बाथरूम असेल, टॉयलेट असेल तेव्हा त्याचा दरवाजा तात्काळ बंद करत चला. या दोन ठिकाणचे दरवाजे सतत उघडे ठेऊ नये.

मित्रांनो ज्या वाटीत मीठ ठेवलं आहे ते दर महिन्याला आपण हे मीठ बदलत चला. जुनं मीठ एखाद्या पाण्यामध्ये टाकून द्या. हे गटारीच्या पाण्यात टाकले तरी चालेल. कुठेही टाकून द्या पण दे बदला. महिलांसाठी एक गोष्ट किचनमध्ये जेव्हा तुम्ही काचेच्या भांड्यात हे मीठ ठेवता या मिठासोबत तीन ते चार लवंगा अवश्य ठेवा. यामुळे आपल्या किचनमधील मीठ दूषित होणार नाही. मीठ नकारात्मक गोष्टीना शोषून घेते त्यामुळे ते दूषित होण्याची शक्यता असते आणि असं मीठ जेव्हा आपण खातो तेव्हा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये या नकारात्मक गोष्टी प्रवेश करत असतात आणि म्हणून छोटीशी गोष्ट आहे तीन ते चार लवंगा टाकून पहा आपल्या घरातील लोकांना आरोग्य लाभेल. घरातील आजारपण दूर होईल, आनंदाची निर्मिती होईल.

जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तव्यावरती भाकरी वगैरे भाजता तेव्हा या भाकरी किंवा चपात्या करण्यापूर्वी तव्यावर चिमूटभर मीठ टाका नंतर ते बाजूला करा आणि भाकरी किंवा चपात्या करा. आपल्या कुंडलीतील राहू दोष असतील, शनीचे कोणतेही साडेसाती दोष असतील ते दूर होतात. खूप साधा सोपा उपाय आहे. जर पतीपत्नीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणे होत आहेत, कलह होत आहेत. तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुध्दा अगदी कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही दिशेला एका काचेच्या वाटीत थोडेसे मीठ ठेऊ शकता. मीठ ठेवल्यानंतर तुम्हाला तात्काळ दिसेल की पतीपत्नीमध्ये वादविवाद कमी होत आहेत, प्रेम वाढू लागले आहे आणि मग तुमच्या सोयीनुसार प्रत्येक आठवडयाला आपण हे मीठ बदलू शकता.

जर घरातील लोक वैर भावनेने वागत असतील, घरामध्ये प्रेम शिल्लक नसेल तर आपल्या घरातला जो नैऋत्य कोपरा आहे या कोपरामध्ये ग्लासभर पाणी घ्या आणि या पाण्यामध्ये मूठभर मीठ टाका. काही दिवसांनी यातील पाणी सुखु लागले की पुन्हा पाणी भरा आणि प्रत्येक महिन्याला हे पाणी बदलत चला. म्हणजे ही पूर्ण सामुग्री टाकून द्या. या सर्व उपायामध्ये मोठ्या मिठाचा वापर केला तर चांगले आहे. मित्रांनो घरातील नेगटीव्ह एनर्जी कमी होईल. घराची बरकत होऊ लागेल. एक प्रकारचा बदल, परिवर्तन दिसून येईल.

जर मुले सतत चिडचिड करतात, सतत रडतात, वारंवार आदळआपट करतात जर नजर लागली असेल, तुम्हाला वाटते की एखाद्याची नजर लागली आहे, नजर दोष आहे तर अशा वेळी तुमच्या डाव्या हातात मोठं मीठ घ्या आणि तुमच्या मुलाच्या डोक्यावरून किंवा पूर्ण शरीरावरुन सात वेळा वारा. आणि त्यानंतर ते फ्लश करून टाका म्हणजे पाण्यामध्ये टाकून द्या.

मित्रांनो त्या मुलाची नजर अगदी सेकंदात उतरते. तुम्ही ते मीठ फ्लश केल्यावर रडणारे मुलं हसु लागते. जर एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा वारंवार आजारी असते. अशावेळी ती व्यक्ती ज्या बेडवर झोपते किंवा जमिनीवर झोपते तेव्हा तिच्या उशाखाली मीठ ठेवायचे आहे. ते मीठ आठवडाभर तसेच असुद्या. आठवड्यानंतर ते बदलत चला. मित्रांनो आजारपणामध्ये फरक दिसून येतो, आजारपण बरे होते. मिठाचे असे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.