या 6 लोकांना कधीच घरात येऊ देऊ नका…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो आर्य चाणक्य म्हणतात की या सहा लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये कधीही येऊ देऊ नका. आम्हाला माहिती आहे की आपण सर्व जण एका सभ्य समाजात राहत आहे त्यामुळे आपण आपल्या घरात येण्यावाचून कोणालाही अडवू शकत नाही.

मात्र मित्रांनो हे जे सहा लोक आहेत हे जर आपल्या घरामध्ये आले तर या लोकांचा जो वाईट प्रभाव आहे तो केवळ तुमच्यावर नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर पडेल आणि त्यामुळे तुमची मनशांती ढळू शकते. म्हणून या सहा प्रकारच्या लोकांना आपल्या घरामध्ये कधीही येऊ देऊ नका.

मित्रांनो पहिला व्यक्ती म्हणजे दुतोंडी लोक म्हणजे असे लोक जे तोंडावर तुम्हाला गोड बोलतील मात्र पाठीमागे तुमची निंदा करतील, तुमच्या बद्धल वाईटच बोलतील. असे लोक हे अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर रहा. मित्रांनो हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट सुद्धा पाडू शकतात.

दुसरा प्रकार म्हणजे चरित्रहीन असणारे लोक. मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असले की या लोकांच्यापासून आपल्याला काही धोका नाही तरी सुद्धा हे लोक अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला मोठी हानी, मोठे नुकसान पोहचू शकतात. असे लोक जर तुमच्या घरामध्ये येऊ लागले तर तुमच्या घराचीही प्रतिष्ठा पणाला लागू शकते. म्हणून अशा चरित्रहीन लोकांना घरी येऊ देऊ नका.

तिसरा प्रकार म्हणजे नीच लोक. नीच म्हणजे काय तर असे लोक की जे अविद्यावान आहेत. ज्यांनी विद्या ग्रहण केलेली नाही. ज्यांचं राहणी मान अस आहे की जे समाजाला अनुरूप नाहीत. जे समाजाच्या नियमांचे पालन करत नाहीत. असे लोक सुद्धा आपल्या घरी येता कामा नयेत. असे लोक आपल्या घरात आल्याने न कळत त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो.

चौथा प्रकार दृष्ट लोक. मित्रांनो अशा प्रकारच्या व्यक्ती दृष्ट प्रकारचे काम करतात. चोरी करतात, लोकांच्यावर अन्याय करतात, दुसऱ्यांच्या आधार करत नाहीत. मित्रांनो या व्यक्ती मानव हितासाठी अहितकारी असतात. म्हणून आपल्याला मुलांना अशा लोकांपासून दूर ठेवा.

पाचवा प्रकार आहे आपल्याला सातत्याने त्रास देणारे लोक. आपल्या जवळपास अशा व्यक्ती असतातच की ज्या आपल्याला सातत्याने त्रास देतातच. म्हणून अशा लोकांना घरी प्रवेश देऊ नका. कारण तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाला सुद्धा याचा त्रास होऊ शकतो.

सहावा प्रकार म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती. या व्यक्तींची योग्यता काहीही नसते मात्र तरीसुद्धा तुमच्या व्यंगावर या व्यक्ती अचूक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुमची मानसिकता खराब होते. तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत राहतात. म्हणून या लोकांपासून शक्य तितके दूर रहावे आणि घरामध्ये प्रवेश देऊ नका. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी या सहा लोकांना अजिबात तुमच्या घरात प्रवेश देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published.