जुनाट खाज, खरूज, नायटा, गजकर्ण बरा करण्याचा सरळ सोप्पा घरगुती उपाय…

आपण आपल्या शरीरावरील फंगल इन्फेक्शन कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे रूपांतर नायटा, खरुज, गजकर्ण यामध्ये होते. आज-काल याचे प्रमाण इतके वाढले आहे की दहापैकी चार लोकांना ही समस्या पाहायला मिळते. अनेकवेळा गजकर्ण व गुप्त अंगावरील खाज सहन होत नाही आणि ती सांगता ही येत नाही. आणि त्याकडे दुर्लक्ष करत राहिल्यास कुटुंबात सर्वांमध्ये पसरत जाते.

खरूज, नायटा व गजकर्ण या समस्या जास्त वेळ उन्हात काम केल्याने, शरीरातून निघणारा घाम शरीरावर जास्त वेळ सुकल्यामुळे किंवा अशा रोग्यांच्या संपर्कात आल्याने अशा समस्या होतात. ज्यांना खाज खरूज गजकर्ण आहेत त्यांच्याशी हात मिळवणे किंवा त्यांचे कपडे वापरणे; अशामुळे त्यांना झालेले स्किन इन्फेक्शन तुम्हाला होते. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात.

मित्रांनो खाज खरुज व गजकर्ण कितीही जुनाट असू द्या, कितीही महिन्यापूर्वीच असूद्या परंतु आजच्या या उपायाने हे हमखास बरे होईल. या रोगाच्या उपायासाठी सर्वप्रथम कारले लागणार आहे. कार्ले आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करून रक्तातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकून रक्त शुद्ध करण्याचे काम करते.

यामधील अँटी फंगल प्रॉपर्टीज आपल्या त्वचेला स्वच्छ व निरोगी ठेवतात. या उपायासाठी एक कारले स्वच्छ धुऊन घ्या. आणि सुरी च्या मदतीने बारीक बारीक तुकडे करून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. शक्य होईल तेवढे कारले बारीक वाटून घ्या. कारण इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी आपण ही पेस्ट सहज लावू शकता.

यानंतर दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे “कापूर”. आणि त्यानंतर तिसरा घटक तो म्हणजे कोरफड. कापूर दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो. हा त्वचेवरील डाग घालवण्यासाठी वापरला जातो. या कापूराची पावडर बनवून घ्या. यानंतर त्यामध्ये नारळाचे तेल मिक्स करा. यासाठी आपल्याला एक चमचा नारळाचे तेल लागणार आहे. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये बनवलेली कारल्याची पेस्ट घाला.

ही पेस्ट एक चमचा किंवा तुमच्या फंगल इन्फेक्शन च्या प्रमाणात प्रमाणात घ्या व त्या मिश्रणामध्ये घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. एक ते दोन मिनीट चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला आहे. ही पेस्ट बोटांनी न लावता त्यासाठी एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे. तो कापूस पेस्टमध्ये बुडवून जेथे इन्फेक्शन झाले आहे तिथे व्यवस्थित लावायचा आहे.

काळजीपूर्वक इन्फेक्शन च्या ठिकाणी ही पेस्ट लावावी. जेणेकरून झालेले इन्फेक्शन संपूर्ण बरे होईल. आणि शरीरावर इतर ठिकाणी पसरणे देखील थांबेल. पहिल्याच वापरापासून याचा परिणाम सुरू होतो. ही पेस्ट शक्‍यतो रात्रीच्या वेळी लावली जेणेकरून रात्रभर ही पेस्ट त्वचेवर राहून प्रभावीत ठिकणावरचे फंगस मरून जाईल.

सकाळी उठल्यावर कोरफड प्रभावित ठिकाणी लावायची आहे. या कोरफडने प्रभावित ठिकाणी मालिश करायचे आहे. दोन ते तीन मिनिटे मालिश केल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवावी. हा उपाय इतका गुणकारी आहे की खाज, खरूज, गजकर्ण व नायटा तुम्ही घरच्या घरी बरे करू शकता. सात ते आठ दिवसाच्या सलग वापराने संपूर्ण इन्फेक्शन बरे होते. आणि कोणतेच निशान देखील त्वचेवर राहत नाही. तर असा हा साधा सोपा पण गुणकारी उपाय तुम्ही नक्की करा. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.