चेहरा पाहून वय सांगू शकणार नाहीत, वांग काळे डाग खड्डे घरगुती उपचार, डॉ स्वागत तोडकर…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळी एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जखम झाली की त्या जखमेच्या जागी काळे डाग पडतात. त्याचप्रमाणे काही व्यक्तींच्या तोंडावर पिंपल्स किंवा फोड येतात. आणि ते फोड फोडल्यानंतर देखील काळे डाग पडतात. कधीकधी वांग, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स येतात.

प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. आणि सुरकुत्या व खड्डे नको वाटतात. या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे. या उपायांसाठी घरातील तीन वस्तू लागणार आहेत. यातील पहिला घटक आहे तो म्हणजे केळी. मित्रांनो आपण बाजारातून केळी आणतो व साल फेकून देतो. पण हे केळीचे साल अत्यंत उपयुक्त असून याचा चेहरा संबंधित फायदा पाहणार आहोत.

आपल्याला यासाठी पिकलेल्या केळीचे साल लागणार आहे. सुरुवातीला एका केळीच्या साला चे बारीक तुकडे करून घ्या. या सालीमध्ये विटामिन ई, डी,सी मोठ्या प्रमाणात असते. जे चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला साल दोन चमचे होईल इतकी घ्यायचे आहे किंवा चेहऱ्याला पुरली पाहिजे. बरेच लोक म्हणतात की हे केळी केमिकल टाकून पिकवली जातात म्हणून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात धुवून घेतली पाहिजे.

या साली बारीक कट करून त्यानंतर पेस्ट करून वापरायच्या आहेत. मित्रांनो यानंतर आपल्याला मध वापरायचा आहे. मध हा अत्यंत उपयुक्त असून लोकांमध्ये असा गैरसमज आहे की यामुळे केस पांढरे होतात. परंतु असा उल्लेख कोणत्याच पुस्तकात नाहीये. यासाठी आपल्याला एक चमचा मध लागणार आहे.

हे सर्व मिश्रण एकत्रित करायचे आहे. हे सर्व चांगले मिक्स करून वाटून घ्यायचे आहे. जळलेले किंवा एक्सीडेंट नंतर चे काळे डाग घालवण्यासाठी दुसरा एक सोपा उपाय असा आहे की सकाळी सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यापूर्वी जी लाळ असते ती लाळ लावायची आहे. ती साधारणत पाच ते सात महिने लावायची आहे.

हे रोज लावायचे आहे तुमचे डाग नक्की निघून जाते. यासाठी तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे दुधावरची साय. ही साय एक चमचा घ्यावी. सायीमुळे त्वचा मुलायम राहते, कोमल बनते त्याचप्रमाणे त्वचेमध्ये मॉइस्चराइजर टिकून राहते. जर सायी मिळाली नाही तर दुधाचा वापर करावा. एखाद्याला मध नको असेल तर फक्त केळीची साल व दुध घेतले तरी चालेल.

हे मिश्रण दिवसभरात केव्हाही एक वेळ लावायचे आहे. अर्धा तास चेहऱ्यावर ठेवायचे आहे व नंतर कोमट पाण्याने धुवायचे आहे. हा उपाय तुम्ही चेहऱ्यासाठी 15 ते 20 दिवस केल्यानंतर तुमचा चेहरा उजळेल, ब्लॅक हेड्‍स कमी होतील व वांग निघून जाईल. परंतु शरीरावरील डाग घालवायचा असेल तर हा उपाय तीन ते पाच महिने करायला हवा. रोज लावणे गरजेचे आहे. वांगासाठी देखील हा उपाय जास्त काळ करणे गरजेचे आहे. हा उपाय तुमच्या मित्रांना देखील सांगा. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.