नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो शरीराला निरोगी राखण्यासाठी आणि स्वस्थ राहावं या साठी ज्या प्रकारे आपल्याला अन्नाची गरज असते म्हणजेच विविध पोषक तत्वांची आपल्याला गरज असते. त्याच पद्धतीन शरीराला शांत झोप मिळण सुद्धा खूप आवश्यक असत. ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहत. अजिबात झोप न येणे, जास्त वेळ झोप न येणे, किंव्हा रात्री उठल्यानंतर पुन्हा झोप न येणे, रात्री उशिरा पर्यंत झोप न येणे, अशा झोपेच्या विविध तक्रारी असतात आणि याची मुख्यता दोन कारणे असतात.
एक म्हणजे शारीरिक कारण आणि दुसरं म्हणजे मानसिक कारण. शारीरिक कारणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि झिंक ही जी पोषण तत्व आहेत ही झोपेला शांत करणारी तत्व आहेत. हे घटक जर तुमच्या शरीरामध्ये कमी असतील तर तुम्हाला शांत झोप लागत नाही. त्याचपद्धतीन व्हिटामिन B1 किंव्हा त्याला आपण थायमिन अस म्हणतो. हे घटक शरीरातील स्नायूना बळकटी देणारे आहेत. हे घटक जरी कमी असतील तरी झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
त्याचपद्धतीने मानसिक कारणामध्ये तुम्ही जर जास्त काळजी करत असाल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, चिंता असेल, प्रचंड निराशा असेल, तरी सुद्धा तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. तर या दोन्ही ही कारणासाठी अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. ज्याने तुम्हाला शांत झोप लागेल.
मित्रांनो हा उपाय आपल्याला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी करायचा आहे. सकाळी जो आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे एक ग्लास कोमट दूध आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण सकाळी प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला उपाशीपोटी करायचा आहे. याने काय होत तर हे टॉनिक सारख तुमच्या शरीरामध्ये काम करत. हे दोन घटक झोप येण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
दुपारी तुम्हाला उपाय करतांना ब्राम्ही चूर्ण घ्यायच आहे. हे चूर्ण तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळेल. ब्राम्ही चूर्ण घेतल्यानंतर दोन ग्लास कोमट दूध घ्यायचे आहे.या दुधामध्ये अर्धा चमचा ब्राम्ही चूर्ण पावडर टाकायची आहे. चे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि प्या.
सकाळी आणि दुपारी कोणता उपाय करायचा ते आपण पाहिलं. आता आपण पाहुयात संध्याकाळी कोणता उपाय करायचा. हा उपाय अतिशय महत्वाचा आहे. संध्याकाळी झोपण्याची आधी तासभर एक केळ घ्यायच आहे. एक दोन ते तीन ठिकाणपासून कापून घ्या. हे केली तीन कॅप पाण्यामध्ये टाकायची आहे. या पाण्याला 5 ते 10 मिनिटे उकळवून घ्यायच आहे आणि या उकळवून घेतलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकायची आहे.
त्यानंतर आणखी थोडं उकळवून घ्यायच आहे. थोडक्यात तुम्हाला केळीचा आणि दालचिनीचा चहा बनवायचा आहे. या चहा मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंग हे घटक असतात. हे घटक तुमच्या मेंदूला शांत करण्याचे काम करतात. तुमच्या शरीराला आवश्यक असणारी पोषण तत्व पुरवतात आणि तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होते.
हा उपाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या पायाची मॉलिश करायची आहे. एक चमचा बदाम तेल आणि एक चमचा मोहरी तेल घ्यायचे आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे आणि पायांच्या तळव्याना चांगल्या पद्धतीने मॉलिश करायची आहे. तुम्हाला झोप येण्यासाठी हे मॉलिश खूप महत्त्वाचं आहे.
मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारे उपाय केलात तर तुम्हाला कितीही दिवसाची झोप न येण्याची समस्या असेल ती निघून जाईल. तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप येईल. हे उपाय तुम्ही नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.