पालीला पळवून लावण्याचा असा चमत्कारिक उपाय जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

मित्रांनो, तुमचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या मी तुम्हाला पालीला पळवून लावण्याचा खूपच सोपा उपाय सांगणार आहे. हा उपाय इतका जास्त परिणामकारक आहे, मी हा कालच करून बघितला आहे व माझ्या घरातील ५ ते ६ पाली बाहेर पळून गेल्या आहेत. हा उपाय मला माझ्या गावातील एक दादी आली होती, तिने सांगितला आहे व मी तो करून बघितला तेव्हा खुपच सहजपणे सगळ्या पाली घराबाहेर पळून गेल्या.

मी विचार केला की मला हे तुमच्याबरोबर शेअर केले पाहिजे म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. मी इथे एक लोटा घेतला आहे, तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता. मी इथे घेतले आहे, १ ग्लास पाणी. ह्या लोटयामध्ये तुम्हाला १ ग्लास पाणी घ्यायचे आहे. हे आहे डेटोल, जे अॅंटी-सेप्टिक लिक्वीड असते व ज्यामध्ये बरेच केमिकल्स म्हणजेच रसायने असतात. ज्याचा उग्र वास पालींना सहन होत नाही.

जर ते पालीच्या अंगावर पडले, तर ते वेगाने पळून जाते. पण मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला पालीवर टाकायची पण जरूर नाही. त्याच्या वासानेच पाली पळून जातील. तुम्हाला इथे २ चमचे डेटोल लिक्विड त्यामध्ये घालायचे आहे. आता तुम्ही बघू शकता, मी घेतला आहे कांद्याचा रस. कांदा किसून वाटून तुम्ही त्याचा रस गाळून काढून घेऊ शकता.

कांद्याच्या रसाचा उग्र वास पण पाली सहन करू शकत नाहीत व त्या पळून जातात. याचा दुर्गंध खूप जोरदार असतो. १ चमचा हा रस त्या मिश्रणात मिसळा. आता तुम्हाला घ्यायचे आहे, सायट्रिक अॅसिड म्हणजेच लिंबाचे सत्व याला आपण लिंबू स्वाद पण म्हणतो. सायट्रिक अॅसिड जर तुम्ही चुकून पालीवर टाकले, तर पाल वाचू शकत नाही,

ती एकतर मरून जाईल, किंवा ती घरातून पळून जाईल, एवढा जास्त उग्र याचा वास असतो. १ चमचा सायट्रिक अॅसिड तुम्हाला घ्यायचे आहे व मिश्रणात घालायचे आहे. आता ह्या सर्व वस्तु तुम्ही व्यवस्थित मिक्स करा. आता कोणतीही स्प्रे बॉटल घेऊन जर ती नसेल तर स्प्रे झाकण मिळते, ते तुम्ही कोणत्याही बाटलीवर लावू शकता.

त्या स्प्रे बॉटल मध्ये हे मिश्रण भरा, व घरातील ज्या भागामध्ये पाली जास्त येतात, तिथे हा स्प्रे तुम्ही मारू शकता. दिवसातून ३ ते ४ वेळा हा स्प्रे तुम्हाला त्या भागामध्ये मारायचा आहे, जिथे पालीचा जास्त वावर असतो. जेव्हा पाल तिथे येईल, तेव्हा ह्या सर्व पदार्थांच्या उग्र वासामुळे ती तुमच्या घरातून पळून जाईल.

तुम्ही हा उपाय जरूर करून बघा. स्प्रे बॉटल नसेल, तर कॉटन बॉल घेऊन ते या मिश्रणात भिजवून जिथे पाल दिसते किंवा असते, त्या ठिकाणी हे बॉल ठेवून द्या. सतत याचा उग्र वास येत राहील व पाली बाहेर पळून जातील. विडियो आवडला असेल, तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *